आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्पर्म डोनेट केलेत. अगोदर डायरीत दिवस आणि वेळ नोंदवून ठेवायचो. आता काही हिशेब ठेवणं जमत नाही. पॉकेटमनीसाठी सुरुवात केली होती. आता विचार केला तर विचित्र वाटतं. सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागात माझ्याच शरीराचे वेगवेगळे हिस्से राहत असावेत. ते वर्ष होतं 2014. मी कॉलेजमध्ये होतो. एक दिवस मित्र काही तरी गुपित सांगितल्यासारखं हळू आवाजात एकमेकांशी बडबडत होते. मी पोहोचताच ते शांत झाले. मी खोदून खोदून विचारलं तरी कुणी काहीच सांगितलं नाही. नंतर एका खास मित्रानं सांगितलं की ते स्पर्म डोनेट करायला जाणार आहेत. मला विचित्र वाटलं. मोबाईलवर फिल्म पाहणं आणि मजामस्तीपर्यंत ठीक होतं. पण स्पर्म डोनेशन? मी त्याला समजावून सांगत होतो आणि तो मला. त्यानंतर दोन महिन्यांनी मीच स्पर्म बँकेत होतो. AC रिसेप्शन असूनही घाम फुटत होता. थोड्या वेळाने मला आत बोलावण्यात आलं. मग समजावून सांगितलं. यावेळी मला फक्त सँपल द्यायचं होतं. त्याची चाचणी केली जाणार होती आणि त्याची क्वालिटी चांगली असेल, तरच ते स्विकारलं जाणार होतं. त्यानंतर HIV आणि इतर टेस्ट होणार. हे सगळं ओके असेल तर मला डोनर कार्ड मिळणार होतं. स्पर्म बँकेत हे ओळखपत्र हीच माझी ओळख असणार होती.
डॉक्टर (स्पर्म बँक मॅनेजर) हे मला समजावून सांगत होते आणि मी शांतपणे ऐकत होतो. बोलून झाल्यावर त्यांनी हलक्या हाताने माझ्या खांद्यावर थोपटलं. मला दिलासा देऊन रिलॅक्स करण्याचा ते प्रयत्न करत होते. मला काहीही करून तिथून बाहेर पडायचं होतं. पुढच्या पाचच मिनिटांनी मी कलेक्शन रुममध्ये होतो. त्या खोलीत हिंदी आणि इंग्रजी मासिकं होतं. अशी मासिकं ज्यांना यापूर्वी मी कधी हातही लावला नव्हता. सोबतच तिथं सँपल गोळा करण्यासाठी एक बॅग ठेवण्यात आली होती. हे वाचा - #HumanStory : भाड्याने रडणाऱ्या ‘रुदाली’ची कहाणी, एका दिवसाला मिळायचे 50 रुपये पुढच्या काही मिनिटांतच माझ्या नशीबाचा फैसला होणार होता. मी मनोमन मित्राला शिव्या घालू लागलो. पॉकेटमनीचं लालूच दाखवून त्यानं आपल्याला इथं यायला भाग पाडलं, असं वाटू लागलं. स्वतःलाही कोसू लागलो. मी लगेच इथून पळून गेलो असतो तर बरं झालं असतं. मात्र आता काही इलाज नव्हता. पुढच्या काही वेळात माझ्या भविष्याचा फैसला होणार होता. थोड्या वेळाने बाहेर पडलो. धावत तिथून दूर गेलो. बरेच दिवस विचार करत बसायचो. मला कॉल नाही आला तर काय होईल? याचा अर्थ भविष्यात मी कधीच बाप होऊ शकणार नाही का? किंवा मला एखादा गंभीर आजार जडल्याचं निष्पन्न झालं तर? बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाचंही एवढं टेन्शन कधी आलं नव्हतं. पहिल्यांदा अफेअर केलं, तेव्हाही एवढी अधीरता नव्हती. तेवढ्यात फोन आला आणि मला पुढच्या भेटीसाठी बोलावण्यात आलं होतं. आता इतर सगळ्या शंका दूर झाल्या होत्या. प्रश्न एवढाच होता की घरच्यांपासून कसं लपवून ठेवायचं? वडील सरकारी नोकरीत होते. आम्ही दिल्लीतल्या जामियानगरमध्ये राहत होतो. तिथंच कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र होते. शिंकलो तरी कुणाला ना कुणाला आवाज जायचा, इतकं मोठं फ्रेंड सर्कल त्या भागात होतं. अशात स्पर्म डोनेशनसारखी गोष्ट लपवायची तरी कशी? आम्ही सर्व मित्रांनी मिळून चर्चा केली. मी सगळ्यात नवा होतो, त्यामुळे सर्वांनीच मला मदत केली. सगळ्या गोष्टी दोनदा तीनदा समजावून सांगितल्या. कॉलेजमध्ये मी नसेल तेव्हा सगळं काही सांभाळून घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. हे वाचा - #HumanStory : गायी सांभाळण्यासाठी कसायाने सोडला पारंपरिक व्यवसाय पहिल्यांदा जेव्हा मी सँपल द्यायला चाललो होतो, तेव्हा इतका सावध होतो की जणू एखाद्या सिक्रेट मिशनवर चाललो आहे. वेळेवर पोहोचलो. सगळ्या टेस्ट केल्या. काही दिवसांतच माझ्याकडे एक डोनर कार्ड आलं. मी ऑन-कॉल स्पर्म डोनर झालो होतो. नवा असूनही आमच्या सगळ्या मित्रांपैकी जास्त मागणी असणारा. वेळोवेळी फोन यायचे आणि मी तिथं पोहोचायचो. आता स्पर्म बँकेच्या त्या थंडगार खोल्या, ती मासिकं यांच्याशी माझी चांगलीच ओळख झाली होती. अऩेकदा मजेशीर घटनाही घडत असत. एकदा तिथं गेल्यावर पाहिलं तर एक तरुण मुलगा रिसेप्शनवर बसून वाट पाहत होता. खूप बेचैन वाटत होता. त्याला चांगलाच घाम फुटला होता. मी तिथं आल्या आल्या इकडं तिकडं पाहू लागला. मी आता ‘पुराना खिलाडी’ झालो होतो. चष्मा आणि हँडबँडही लावला होता. डोकं अर्ध झाकलेलं. डोळे पूर्ण बंद. अशा अवस्थेत एकदा पाहिलं तरी पुन्हा ओळखण्याचा धोका कमी होता. नंतर लक्षात आलं की ओळख लपवण्याचा प्रयत्न करणारा मी एकटाच नव्हतो. अनेक मुलं अशीच ओळख लपवत फिरत होती. पॉकेटमनीसाठी स्पर्म डोनर झालो. हळू हळू त्याची सवय होत गेली. मात्र अजूनही ही गोष्ट घरच्यांना सांगितली नाही. सांगितलं तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याचा साधारण मला अंदाज आहेच. आमच्या वयाची मुलंसुद्धा या कामाची आणि आमची खिल्ली उडवत असतात. एकजण म्हणाला, जो सगळ्या जगाला स्पर्म वाटत फिरतो, त्याला लग्नानंतर स्वतःला मूल होण्याच्या वेळी मात्र स्पर्म संपलेले असतील. हे ऐकून मी बराच काळ सुन्न झालो होतो. रात्रभर इंटरनेटवर याची माहिती घेत राहिलो. काही दिवसांनी पुन्हा स्पर्म बँकेतच होतो. हे वाचा - #HumanStory : कुत्र्यांना ट्रेनिंग देणाऱ्या तरुणीची गोष्ट, याच कुत्र्यांनी भूकंपानंतर शोधले होते मृतदेह अगोदर दर आठवड्याला जायचो. त्यावेळी पाच दिवस काळजी घ्यावी लागायची. म्हणजेच त्या दिवसात दारू नाही, सिगरेट नाही, फिजिकल इंटिमेशन चालणार नाही. तसं केलं तर सँपल खराब होतं. फोन आला आणि तुम्ही होकार दिलात, तर पाच दिवस हे पथ्य पाळावंच लागायचं. आता मी फक्त काहीशे रुपयांसाठी नाही, तर एका अनोळखी, अज्ञात कपलसाठी हे काम करू लागलो होतो.
कॉलेज संपलं. बँकेत नोकरी मिळाली. एका वर्षापूर्वी लग्नही झालं. आताही मी डोनेट करतो, पण प्रमाण फारच कमी आहे. बायकोला कळणारही नाही, याची काळजी घेत स्पर्म बँकेत जाऊन येतो. तिला समजलं तर लग्नच मोडेल आमचं. भिती वाटते, पण फोन आल्यावर नकार देण्याची इच्छा होत नाही. पाच वर्षांपूर्वी मिळालेला तो डोनर नंबर हा माझ्या स्वतःपेक्षाही माझी मोठी ओळख बनला आहे. सुरुवातीला जायचो, तेव्हा सर्वात अगोदर ही गोष्ट डायरीत लिहिण्याचं काम करायचो. लक्षात राहावं, म्हणून तारीखही लिहून ठेवायचो. मग वारंवार जाऊ लागलो. डायरी लिहिणं बंद झालं. आता दिल्ली सोडून सोनीपतला राहायला आलो आहे. डायरी कुठं आहे, माहित नाही. आतापर्यंत 100 पेक्षाही जास्तवेळा स्पर्म डोनेशन केलं आहे. त्यातले निम्मे जरी यशस्वी झाले असतील, तरी आज मी 50 मुलांचा बाप आहे. कुणाचे डोळे माझ्यासारखे असतील, कुणाचे केस माझ्यासारखे असतील, कुणी माझ्यासारखं चालत असेल. बँकेत कॉम्प्युटरपुढे बसून काम करताना असे विचार येत राहतात. माझी मुलं जी मला ओळखत नाहीत आणि आयुष्यात कधीही भेटणार नाहीत.