जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / #PGStory: शायरीवरून सुरू झालेली Love Story शायरीवरच संपली

#PGStory: शायरीवरून सुरू झालेली Love Story शायरीवरच संपली

#PGStory: शायरीवरून सुरू झालेली Love Story शायरीवरच संपली

काय झालं कुणास ठाऊक! तिला अचानक त्याची शायरी आवडणं बंद झालं. तो जितक्या मनापासून तिला शायरी ऐकवायचा, तितक्याच मनापासून ती त्याचा अपमान करायची.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “ पीजी स्टोरी ”चा हा नववा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील.  ही गोष्ट आहे राघव श्रीवास्तव (बदललेलं नाव) याची. राघव हा पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मूळचा युपीतील बहराईचचा असणाऱ्या राघवनं खडकपूर आयआयटीतून इंजिनिअरिंग केलं आहे. या काळात त्यानं कॉलेज जीवनाचे अनेक रंग जवळून अनुभवले. त्यातीलच एक किस्सा त्याने इथं शेअर केला आहे.  जेव्हा बी.टेक.च्या पहिल्या सेमिस्टरला होतो, तेव्हाचा हा किस्सा आहे. बहराईचमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेईई ऍडव्हान्स परीक्षा पास झालो आणि मला आयआयटी खडकपूरमध्ये प्रवेश मिळाला. पहिल्यांदाच बहराईच सोडून मी अशा जागी आलो होतो जिथं स्वातंत्र्य होतं, जिथं मी मोकळा श्वास घेऊ शकत होतो. आयुष्य म्हणजे काय, जग म्हणजे काय यासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळायला इथे आल्यावरच सुरुवात झाली. गावात एक मुलगा आणि मुलगी यांनी दोन मिनिटं गप्पा मारल्या तरी जणू काही आभाळ कोसळत असे. इथे मात्र परिस्थिती अगदीच वेगळी होती. इथं तर मुली या मुलींपेक्षाही मुलांमध्येच जास्त मिसळत होत्या. आपले मुद्दे मांडणे, वाद घालणे, चर्चा करणे हे इथल्या मुलींना सहज जमायचं.   हे वाचा -  #PGStory: तुमची लेक बिघडलीय, रुमवर बॉयफ्रेंड येतात!; घरमालकाने फोडले बिंग एकदा ओरिएंटेशन प्रोग्राम सुरू होता. मी आणि माझा रुममेट मनिष शुक्ला दोघंही तिथे पोहोचलो. तिथे आमची सीनिअर्ससोबत ओळख करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी शेफाली नावाची एक सीनिअर मुलगी मनिषला भेटली. दोघंही एकमेकांना असे भेटले जणू काही फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असावेत. त्यांची छोटीशी भेट काही दिवसांतच दीर्घ भेटींमध्ये रुपांतरित होऊ लागली. अभ्यासाव्यतिरिक्त मिळणारा सगळा वेळ मनिष शेफालीसोबत घालवत होता. दोघंही साहित्य, शायरी आणि कविता यांचे जबराट फॅन.   मनिषच्या जिभेवर सतत असणारी शायरी हे त्यांच्यातील मैत्रीचं एक मुख्य कारण होतं. मनिष शेफालीवर शायरी लिहायचा आणि ती मन लावून त्याच्या ओळी ऐकत बसायची. दोघांचंही एकमेकांवरचं प्रेम दाट होत होत होतं. मात्र अचानक काहीतरी घडलं आणि त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात झाली. नेमकं काय झालं असावं, हे मनिषलाही समजत नव्हतं.   हे वाचा -  PGStory: तीन मित्र दीड दिवसांपासून दारू पित होते; एकाने अचानक विचारलं, “याच्या बॉडीचं काय करायचं?” दोघांमधली भांडणं वाढत चालली होती. एकदा मनिष सर्व मित्रांसमोर तिला शायरी वाचून दाखवत होता. त्यावेळी ‘काय तू फुटकळ शायऱ्या लिहितोस रे’ असं म्हणत रागावून ती तिथून निघून गेली. त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटलं. मात्र मनिषचा आपल्या निर्मितीवर पूर्ण विश्वास होता. तो जितक्या मनापासून शायरी वाचायचा, शेफाली तितक्याच मनापासून त्याचा जाहीर अपमान करायची.   मनिषचा हा गुणच त्याचा शत्रू ठरत होता. मात्र तरीही तो शायरी लिहित राहिला आणि शेफाली त्याच्यापासून दुरावत राहिली. अशा प्रकारे शायरीपासून सुरू झालेली प्रेमकथा शायरीमुळेच संपली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात