Home /News /lifestyle /

HumanStory: जन्मभर केली लाकूडतोड; सत्तरीत सुरू झालं नवं करिअर, पोहोचल्या इटली, फ्रान्समध्ये

HumanStory: जन्मभर केली लाकूडतोड; सत्तरीत सुरू झालं नवं करिअर, पोहोचल्या इटली, फ्रान्समध्ये

नुकसान झाल्याचं समजलं तेव्हा त्या म्हणाल्या, अरे उदास काय होतोस? अस्वलाचा एक केस गळला, म्हणून काय ते रडत बसतं का?

  शेती, गुरंढोरं, जंगलातून लाकडं तोडून आणणं, मुलाबाळांचा सांभाळ यात वयाची 70 वर्षं कशी गेली, तेच समजलं नाही. त्यानंतर त्यांच्या हातात ब्रश आला. ज्या वयात हात कापू लागतात, नजर थरथरू लागते, त्या वयात त्यांनी पेंटिंग सुरू केलं. 10 वर्षांत ही पेेंटिंग इतकी गाजली की पॅरिस आणि मिलानसारख्या शहरांमध्ये त्यांचं प्रदर्शन भरायला सुरुवात झाली. वाचा, मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील ‘गुमनाम’ गावच्या बैगा कलाकार जोधईया बाईंविषयी.  बरीच वर्षं झाली आम्ही गरीबीतच जगतो आहोत. पोटभर जेवण करून आम्ही झोपलोय, असं कधी आठवतच नाही. मुलंबाळं छोटी होती. सकाळी कामावर निघायचे आणि थेट रात्री परत यायचे. काय तरी काय? कुणाच्या तरी शेतात कसायला जाणे, कुणाकडे शेणाच्या गोवऱ्या तयार करायला जाणे, कुणाची कुठली तरी मजुरी. आमच्या गावाभोवती दाट जंगल आहे. इतकं घनदाट जंगल की झाडं एकमेकांत घुसलेली आहेत. अशा जंगलात मी झाडं तोडायला जायचे. संध्याकाळनंतर तिथे कुणी अडकला तर वाघ, चित्ते हल्ला करत. अस्वलं तर दिवसाढवळ्याही हल्ले करत. अनेकजण त्याची शिकार झाले होते. रोज सकाळी उठून कामासाठी बाहेर पडताना जिवाची भीती वाटायची. मग मुलांच्या तोंडाकडे बघून मी निमूट कामावर जायचे. सोबत धारदार कुऱ्हाड असायची. पूर्ण ताकद लावून लाकडं तोडताना काळजी घ्यावी लागे.
   जर कुठला प्राणी जवळ आल्याची जाणीव झाली तर लगेच ताठ उभं राहून प्राण्याला घाबऱवण्यासाठी पवित्रा घ्यायचा. 
  आमच्याच गावात शांतीनिकेतनमधून शिकून आलेले कलाकार आशिष स्वामी राहायचे. दुर्लक्षित असणाऱ्या बैगा आर्टचा जगभर प्रसार करण्यासाठी त्यांनी आमच्याच गावात स्टुडिओ सुरु केला होता. इथूनच त्यांचं काम चालायचं. जोधईया बाई या आशिष यांनाच आपला गुरु मानतात आणि त्यांच्या स्टुडिओत काम करतात.  त्या सांगतात, गुरुजींकडे पोहोचले तेव्हा लाकडं तोडून तोडून कंबर दुखत होती. मी कंबरेतून वाकले होते. शिकायला बसले, तर काहीच समजत नव्हतं. आयुष्यात कधीही ब्रश पाहिला नव्हता. त्यावेळी शेणाचं काम केलं आणि मग मातीचं काम करू लागले.  हळूहळू कॅनव्हास पकडला. आणि खरे रंगही. मातीचा रंग, जंगलाचा रंग, पाण्याचा रंग. मनात यायचं, हे करून नंतर जंगलातच तर जावं लागणार आहे. पण शिकत राहिले. आपल्या वयाने सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या शिष्येविषयी आशिष स्वामी सांगतात - या म्हातारीच्या नसानसांत कमालीची ताकद आणि नजाकत आहे. एकदा बसल्या की हलतही नाहीत. बारीक बारीक कलाकुसर करताना तरुणांचे डोळेही थकतात, मात्र या बाई तासनतास हे काम करत राहतात. ज्या वयात अनेकजण म्हातारे म्हणजे काम करण्यास अपात्र होतात, त्या वयात काहीजणांचं करिअर सुरू होतं.  जोधईया बाईंना मात्र आपल्या स्तुतीशी काहीच देणंघेणं नाही. त्या म्हणतात - नजर कमजोर झाली आहे. एका डोळ्यात मोती पडला आहे. हळूहळू जमेल तसं करते. पण काम चांगलं आहे. तास-दोन तास काम करते. मग जरा इकडे तिकडे फिरते, बाकीची कामं करते. माझ्या आरटमुळे (आर्टमुळे) जंगलातच्या अस्वलावर तर काहीच फरक पडत नाही. तो आपला मजेत मधाची पोळी उडवत असतो.  आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकदा काही कारणांमुळे त्यांच्या पेंटिंग ग्रुपचं नुकसान झालं. गुरुजींनी ही गोष्ट इतरांना सांगितली. म्हणाले, काही कारणामुळे आपलं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आपली आयडिया चोरण्यात आली असून त्यामुळे आपले पैसेदेखील बुडाले आहेत. जोधईया बाई म्हणाल्या, अरे कशाला इतका उदास होतोस. अस्वलाच्या पाठीवरचा एक केस गळाला म्हणून ते काही रडत बसत नाही.  पूर्ण हयात जंगल पाहण्यात गेलेल्या बाईंची चित्रंही त्याच विषयावर असतात. तारस्वरात बोलणाऱ्या जोधईया बाई सांगतात, आम्ही जे आजूबाजूला पाहतो, त्याचीच चित्रं काढतो. पोळं, अस्वल, वाघ वगैरे. वाघ हा आमचा देव आहे. आम्ही त्याची पूजा करतो. जोधईच्या चित्रात मातीचे रंग, चुना, खडू, पिवळ्या मातीचा रंग यांचा जास्तीत जास्त वापर झाल्याचं दिसतं. यासोबत सिंथेटिक रंगही असतात. अगदी फुल्ल ऑफ लाईफ. त्यात उदासीची एकही छटा जाणवत नाही.  जंगलपुत्र उदास होत नाहीत नुकतंच इटलीच्या मिलान शहरात आणि फ्रान्सच्या पॅरिस शहरात त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. जोधईया बाईंना या शहरांविषयी काहीच माहित नाही. साता समुद्रापार कुठेतरी ही शहरं आहेत, एवढंच त्यांना माहित. त्या एकदा रेल्वेनं दिल्लीला आल्या होत्या. आयुष्यात एकदा विमानात बसण्याची त्यांची इच्छा आहे. वाघ देवाची इच्छा असेल तर हे स्वप्नही पूर्ण होईल, असं त्या म्हणतात.  आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. 80 वर्षं वयाच्या जोधईया बाई मनसोक्त नाचत आयुष्य जगत आहेत. त्या म्हणतात, अगोदर जंगलात जात होते, आता मीच जंगल बनवते.
  Published by:desk news
  First published:

  Tags: France, Human story, Italy, Madhya pradesh, Painting

  पुढील बातम्या