मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup वर यंदा Team India कोरणार नाव; या युवा खेळाडूंची मिळणार साथ!

T20 World Cup वर यंदा Team India कोरणार नाव; या युवा खेळाडूंची मिळणार साथ!

Team India

Team India

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यां टीमध्ये टीम इंडियाला टी20 वर्ल्डकपचा प्रबळ दावेदर मानले जात आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई,23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्या टीमध्ये टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदर मानले जात आहे. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपचे दोन्ही सराव सामने जिंकून आपला दावा आणखी मजबूत केला आहे. त्यामुळे यंदाच्या टी20 World Cup वर विराटची सेना आपले नाव कोरणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

काही दिवसापूर्वी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली, यात भारतीय टीममध्ये आर. अश्विनचं (R Ashwin) 4 वर्षांनंतर पुनरागमन झालं. 15 सदस्यीय टीममध्ये 6 स्पेशालिस्ट बॅट्सम, तीन ऑल राऊंडर, तर तीन-तीन स्पिनर आणि फास्ट बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टीममध्ये शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये काही युवा खेळडूंनाही स्थान दिले आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफच्या बरोबरीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मेन्टॉरच्या भूमिकेत असणार आहे.  टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांचा समावेश दुसऱ्या म्हणजे एकाच गटात झाला आहे. त्यामुळे गटवार साखळीपासून आपल्याला दोन्ही टीम दरम्यानच्या लढती अनुभवता येतील. 24 ऑक्टोबरला दुबईत दोन्ही टीमची साखळी सामन्यात गाठ पडेल.

या सामन्यात पहिली नजर ही कर्णधार विराट कोहलीकडे असणार आहे. कारण विराट T20 टीमचा कॅप्टन म्हणून शेवटची स्पर्धा खेळणार आहे. विराटने आतापर्यंत 45 टी 20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 45 पैकी 29 मॅचमध्ये विजयी केलं. तर 29 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने अस्मान दाखवलं. वनडेप्रमाणेच टी 20 मध्येही 2 मॅचेसचा निर्णय लागला नाही.

विराटने सातत्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. मात्र विराटला एकदाही आयसीसीच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देता आलेलं नाही. त्यामुळे विराटवर या मुद्द्यावरुन अनेकदा टीकेची झोड उठवण्यात आली. त्यामुळे विराट कॅप्टनसी सोडण्यापूर्वी यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपवर इंडियाचे नाव कोरुन इतिहास रचतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारतीय संघाचा विचार करता युवा फलंदाज इशान किशनवर (Ishan Kishan) अनेकांच्या नजरा असतील. इंग्लंडलविरुद्ध मार्चमध्ये टी20 डेब्यू करणाऱ्या इशानने 32 चेंडूत 52 धावा सलामीच्या सामन्यात ठोकल्या त्यानंतर आता आयपीएलमध्ये त्याने खास कामगिरी नसली केली तरी काही सामन्यात त्याने चुणूक दाखवली खरी. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अनेकांचे लक्ष असेल.

इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियावर देखील भारी पडला. दोन्ही सामन्यांमध्ये संघाच्या फलंदाजांची कामगिरी अतिशय चांगली होती. केएल राहुल (KL Rahul), ईशान किशन, रोहित शर्मा (Rohit Sharma) या तिघांनी सराव सामन्यात जोरदार धावा लुटल्या.

दोन्ही सामन्यांमध्ये संघाच्या बॅट्समनची कामगिरी अतिशय चांगली होती. विशेष म्हणजे ईशान किशन. आगामी होणऱ्या सामन्यात युवा खेळाडूंकडे अधिक लक्ष असेल.

तसेच, रिषभ पंत आयपीएल 2021 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १० व्या स्थानी आहे. त्याने 16 डावात 419धावा केल्या होत्या. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली होती. आता तो पहिल्यांदाच टी -20 विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या बॅटिगकडे वळल्या आहेत.

यासोबतच, पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2021 चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला होता. आयपीएल 2021 स्पर्धेत त्याने तुफान फटकेबाजी करत 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याने 13 सामन्यात 636 धावा केल्या. तसेच आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यांमध्ये देखील केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्यामुळे या स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

बॅट्समनची कामगिरी पाहता चौथ्या क्रमांकावर कुणाला खेळवण्यात येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, विशेष म्हणजे शेवटच्या क्षणी शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी देण्यात आली. सुरुवातीला त्याची निवड राखीव खेळाडू म्हणून करण्यात आली होती. परंतु शेवटच्या क्षणी अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले. तर अक्षर पटेलला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या १६ सामन्यात एकूण २१ गडी बाद केले होते. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, या संधीचा तो कसा फायदा घेतो?

यासोबतच, मिस्ट्री गोलंदाज’ म्हणून ओळखला जाणारा वरून वरून चक्रवर्ती ६ वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्याने आयपीएल 2021 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला असला तरीदेखील त्याने आयपीएल 2021 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या हंगामात एकूण 17 सामने खेळले. ज्यामध्ये त्याला 18 गडी बाद करण्यात यश आले आहे.

गोलंदाजीमध्ये विशेष लक्ष असणार आहे ते सध्या अनफिट असणारा हार्दिक पांड्या. गेल्या काही दिवसांपासून पांड्याने गोलंदाजी केलेली नाही. तो लवकरच गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल असे त्याच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पण त्याने गोलंदाजी केलीच नाही तर क्रमांक सहाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम (Team India Squad)

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन

राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

भारताचे वेळापत्रक (Team India Schedule)

24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30 वाजता

3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता

8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता

ग्रुप-1 मधल्या टीम

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

बांगलादेश

ग्रुप-2 मधल्या टीम

भारत

पाकिस्तान

न्यूझीलंड

अफगाणिस्तान

स्कॉटलंड

नामिबिया

2007मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारताने जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर भारताला या स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेले नाही. 2016 मध्ये वेस्ट इंडिजने या स्पर्धेचं जेतेपद पटकावले होते. यापूर्वी 2019 च्या इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान टीमची एकमेकांशी गाठ पडली होती. आणि ती हाय-प्रोफाईल मॅच भारताने 89 रननी जिंकली होती.

First published:

Tags: MS Dhoni, Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india, Virat kohli