मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'छुपा रुस्तम' केन विलियमसन, New Zealand ला लागोपाठ दुसरी ट्रॉफी जिंकवून देणार!

T20 World Cup : 'छुपा रुस्तम' केन विलियमसन, New Zealand ला लागोपाठ दुसरी ट्रॉफी जिंकवून देणार!

सातव्या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपला ( T-20 Cricket World Cup) 17 ऑक्टोबर पासून सुरवात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) देखील सहभागी असून, या स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात काही लक्षणीय बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 21 ऑक्टोबर : सातव्या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपला ( T-20 Cricket World Cup) 17 ऑक्टोबर पासून सुरवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या स्पर्धेचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपमधील मॅचेस आता यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) खेळल्या जात आहेत. `बीसीसीआय`कडे (BCCI) टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद कायम असेल. वर्ल्ड कपची फायनल मॅच 14 नोव्हेंबरला होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) देखील सहभागी असून, या स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात काही लक्षणीय बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. केन विलियमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड कपसाठी उतरला आहे. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) जिंकल्यानंतर न्यूझीलंड लागोपाठ दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.

वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारलेल्या न्यूझीलंड संघाने टी-20 साठी जोरदार तयारी केली आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2021) न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन खेळला होता. त्यामुळे तो आता वर्ल्ड कपमध्येही ओपनिंग बॅटिंगसाठी तयार असेल. विलियमसन, मार्टिन गप्टिल यासारखे बॅट्समन असल्याने न्यूझीलंडची बॅटिंगची बाजू पक्की आहे. विकेटकीपर टीम सायफर्टही फलंदाजीची बाजू लावून धरू शकतो.

बॉलिंगचं म्हटलं तर ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, लॉकी फर्ग्युसन यांच्या गोलंदाजीचा टीमला जबदस्त फायदा होईल. स्पिनर ईश सोधी, टोड अॅस्टल, मिशेल सँटनर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल. आपल्या गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय बॅट्समनना तंबूत कसं पाठवायचं ते हे तिघं उत्तम जाणतात. विकेट्सही त्यांना पोषक असल्याचं बोललं जातंय त्यामुळे संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची असेल.

अर्थात क्रिकेट सांघिक खेळ आहे त्यामुळे एकत्रित कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विलियमसन सर्वांकडून त्यांचा उत्तम खेळ काढून घेण्यात प्रवीण आहे, त्यामुळे आता टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेमध्ये ते जगज्जेतेपदावर नाव कोरताता का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूझीलंडची टीम (New Zealand Squad)

केन विलियमसन (कर्णधार), टोड अॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट (विकेटकीपर), ईश सोधी, टीम साउदी

न्यूझीलंडचं वेळापत्रक (New Zealand Schedule)

26 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- संध्याकाळी 7.30 वाजता

31 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध भारत- संध्याकाळी 7.30 वाजता

3 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड- दुपारी 3.30 वाजता

5 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध नामिबिया- दुपारी 3.30 वाजता

7 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान- दुपारी 3.30 वाजता

ग्रुप-1 मधल्या टीम

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

बांगलादेश

ग्रुप-2 मधल्या टीम

भारत

पाकिस्तान

न्यूझीलंड

अफगाणिस्तान

स्कॉटलंड

नामिबिया

First published:

Tags: New zealand, T20 world cup