भारतीय संघातल्या (India Vs Australia) एक-दोन नव्हे 9 खेळाडूंना या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापती झाल्या. त्यातल्या काहींच्या गंभीर असल्याने त्यांना दौराच सोडावा लागला, तर काहींना ऐन मोक्याच्या क्षणी इजा झाली. पण तरीही एकमेकांना सावरत त्यांनी सामना ऑस्ट्रेलियाच्या हाती जाण्यापासून रोखलं.