जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : ग्रुप ऑफ डेथ होणार आणखी धोकादायक, Bangladesh कोणाला धक्का देणार?

T20 World Cup : ग्रुप ऑफ डेथ होणार आणखी धोकादायक, Bangladesh कोणाला धक्का देणार?

T20 World Cup : ग्रुप ऑफ डेथ होणार आणखी धोकादायक, Bangladesh कोणाला धक्का देणार?

सध्या सगळीकडे टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेची (T-20 World Cup) धूम आहे. यंदा ही स्पर्धा नव्या स्वरूपात खेळली जाणार असून या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुपर 12 (Super-12) फेरी होत आहे. या स्पर्धेत बांगलादेशचा संघही (Bangladesh Team) उतरला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    दुबई, 23 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेची (T-20 World Cup) धूम आहे. यंदा ही स्पर्धा नव्या स्वरूपात खेळली जाणार असून या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुपर 12 (Super-12) फेरी होत आहे. म्हणजेच या फेरीत यंदा 12 संघांचा समावेश होणार आहे. भारत (India) या स्पर्धेचा आयोजक असून, कोविडमुळे ओमान (Oman) आणि यूएई (UAE) या आयसीसीच्या (ICC) सहयोगी सदस्य देशांमध्ये सामने घेतले जात आहेत. या स्पर्धेत बांगलादेशचा संघही (Bangladesh Team) उतरला आहे. गेल्या काही काळापासून बांगलादेशचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशचा कॅप्टन महमदुल्लाह असून पहिल्या फेरीच्या ब गटात त्यांच्या टीमचा समावेश करण्यात आला आहे. कॅप्टन महमदुल्लाहच्या नेतृत्वाखाली या संघानं 17 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंडविरुद्धच्या (Scotland) पहिल्या फेरीतील पहिला सामना खेळला. त्यात या संघाला पराभव पत्करावा लागला. हा या संघासाठी मोठा धक्का होता. यानंतर त्यांनी ओमान आणि पपुआ न्यू गिनीवर विजय मिळवत सुपर-12 मध्ये प्रवेश केला. बांगलादेशची टीम आता ग्रुप ऑफ डेथ समजल्या जाणाऱ्या ग्रुप-1 मध्ये दाखल झाली आहे. या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकाही आहे. 2007 मध्ये बांगलादेश सुपर 8 मध्ये पोहोचला होता. आता यंदा हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 24 वर्षीय मोहमद नईम बांगलादेशचा सर्वोत्तम बॅटसमन असून, मुस्ताफिझुर रहमान या सर्वोत्कृष्ट बॉलर आहे. या दोघांचीही आयसीसी रँकिंग सर्वाधिक आहेत. ओमानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशला विजय मिळवून देण्यात सलामीवीर (ओपनर) मोहमद नईम याच्या अर्धशतकाचा मोठा वाटा होता. अनुभवी शाकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, मुस्तफिझूर रहमान हे संघाची ताकद आहेत. बांगलादेशने नुकताच आपल्या घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला टी-20 सीरिजमध्ये पराभूत केलं होतं. बांगलादेश टी-20 टीम (Bangladesh Squad) मोहम्मदुल्लाह (कर्णधार) , मोहमद नईम, सौम्या सरकार, लिटन दास, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ हुसैन, नुरल हसन सोहन, शाक माहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, शोरीफुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, शमीम हुसैन बांगलादेशचं वेळापत्रक (Bangladesh Schedule) 24 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका- दुपारी 3.30 वाजता 27 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध इंग्लंड- दुपारी 3.30 वाजता 29 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज- दुपारी 3.30 वाजता 2 नोव्हेंबर- बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुपारी 3.30 वाजता 4 नोव्हेंबर- बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुपारी 3.30 वाजता ग्रुप-1 मधल्या टीम वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका बांगलादेश ग्रुप-2 मधल्या टीम

    भारत पाकिस्तान न्यूझीलंड अफगाणिस्तान स्कॉटलंड नामिबिया

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात