मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पहिल्या विजेतेपदासाठी Australia लावणार बाजी, 'या' खेळाडूंचा फॉर्म ठरणार निर्णायक

T20 World Cup: पहिल्या विजेतेपदासाठी Australia लावणार बाजी, 'या' खेळाडूंचा फॉर्म ठरणार निर्णायक

वन-डे वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलिया (Australia) टीमला टी20 वर्ल्ड कपनं वारंवार हुलकावणी दिली आहे. आता यूएईत होणाऱ्या सातव्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) ही प्रतीक्षा संपवण्याच्या निर्धारानं ही टीम उतरणार आहे.

वन-डे वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलिया (Australia) टीमला टी20 वर्ल्ड कपनं वारंवार हुलकावणी दिली आहे. आता यूएईत होणाऱ्या सातव्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) ही प्रतीक्षा संपवण्याच्या निर्धारानं ही टीम उतरणार आहे.

वन-डे वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलिया (Australia) टीमला टी20 वर्ल्ड कपनं वारंवार हुलकावणी दिली आहे. आता यूएईत होणाऱ्या सातव्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) ही प्रतीक्षा संपवण्याच्या निर्धारानं ही टीम उतरणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दुबई, 23 ऑक्टोबर: वन-डे वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलिया (Australia) टीमला टी20 वर्ल्ड कपनं वारंवार हुलकावणी दिली आहे. आता यूएईत होणाऱ्या सातव्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) ही प्रतीक्षा संपवण्याच्या निर्धारानं आरोन फिंचची (Aaron Finch) टीम उतरणार आहे. या टीममध्ये अनेक दिग्गज आणि मॅच विनर्स खेळाडूंचा समावेश आहे. पण प्रमुख खेळाडूंचा फॉर्म आणि कमी क्रिकेट ही कॅप्टन फिंच समोरची मोठी डोकेदुखी असणार आहे.

ऑस्ट्रेलियानं मागील पाच टी20 सीरिज गमावल्या आहेत. इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि सर्वात अलिकडं बांगलादेशनंही त्यांचा पराभव केला. त्यात आणखी एक त्रासदायक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियानं मागील 21 पैकी 15 टी20 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मात्र या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्व दिग्गज खेळाडू कधीही एकत्र खेळले नाहीत. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा मोठा फटका त्यांना बसला आहे. या वर्ल्ड कपसाठी तशी परिस्थिती नाही. सर्व दिग्गज टीममध्ये परतल्यानं ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याची चूक कोणतीही टीम करणार नाही.

ऑस्ट्रेलियाकडं आरोन फिंच (Aaron Finch) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) ही अनुभवी आणि आक्रमक ओपनिंग जोडी आहे. या जोडीनं 25 इनिंगमध्ये 41.04 च्या सरासरीनं 944 रन एकत्रित काढले आहेत. आयपीएलमध्ये खराब कामगिरीमुळे टीमबाहेर बसलेला वॉर्नर या वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो याकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. तिसऱ्याी क्रमांकावर अनुभवी स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) असून स्पिन बॉलिंगला मदत करणऱ्या यूएईच्या पिचवर त्याचं कौशल्य टीमला उपयुक्त ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरमध्ये मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, मार्सस स्टॉईनिस आणि ही आयपीएल स्पर्धा गाजवणारा ग्लेन मॅक्सवेल हे आक्रमक खेळाडू आहेत. यापैकी मॅथ्यू वेड हा ओपनिंगलाही उपयुक्त ठरू शकतो. मॅक्सवेलवर मधल्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करण्याची जबाबदारी  असेल तर मिचेल मार्श आणि स्टॉईनिसला फिनिशर्सचं काम करावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि केन विल्यमसन असा जोरदार फास्ट बॉलिंगचा अटॅक आहे. वर्ल्ड कपमध्ये स्टार्कनं नेहमीच चांगली कामगिरी केलीय. पॅट कमिन्स मोठ्या ब्रेकनंतर ताजा होऊन परतलाय. जोश हेजलवूड आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा सदस्य आहे. यूएईच्या पिचवर बॉलिंग करण्याचा सर्वात ताजा अनुभव त्याच्याकडं आहे. तर केन रिचर्डसनकडं डेथ ओव्हर्सची जबाबदारी असेल.

अ‍ॅस्टन अगर आणि अ‍ॅडम झम्पा हे दोन स्पिनर्स ऑस्ट्रेलियाकडं आहेत. यापैकी अगरवर सातव्या किंव्या आठव्या नंबरवर येऊन झटपट रन करण्याचीही जबाबदारी असेल. याशिवाय मिचेल स्वेपनसन हा अतिरिक्त लेग स्पिनर ऑस्ट्रेलियाकडं आहे. शेन वॉर्ननी त्याला खास टिप्स दिल्या असून त्या टिप्सची अंमलबजावणी तो या वर्ल्ड कपमध्ये करेल. टी20 लीग गाजवलेला पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेला जॉश इंग्लिस हा विकेटकिपर-बॅटर ऑस्ट्रेलियाकडं आहे. मिडल ऑर्डरमधील कुणी जखमी झाल्यास अथवा त्याचा फॉर्म हरपल्यास इंग्लिसला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाची टीम (Australia Squad)

आरोन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड (विकेट किपर) स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल मार्श, अ‍ॅस्टन अगर, पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झम्पा.

ऑस्ट्रेलियाचं वेळापत्रक (Australia Time Table)

23 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया- दुपारी 3.30 वाजता

28 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - दुपारी 3.30 वाजता

30 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - संध्याकाळी 7.30 वाजता

4 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश - दुपारी 3.30 वाजता

6 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज - दुपारी 3.30 वाजता

ग्रुप-1 मधल्या टीम

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

बांगलादेश

ग्रुप-2 मधल्या टीम

भारत

पाकिस्तान

न्यूझीलंड

अफगाणिस्तान

स्कॉटलंड

नामिबिया

First published:

Tags: Australia, Cricket news, T20 world cup