• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: अडचणीतील Afghanistan मध्ये दिग्गजांना धक्का देण्याची क्षमता

T20 World Cup: अडचणीतील Afghanistan मध्ये दिग्गजांना धक्का देण्याची क्षमता

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ही टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. सर्व अनिश्चित परिस्थितीवर मात करत अफगाणिस्तानची टीम वर्ल्ड कपसाठी दाखल झाली आहे.

 • Share this:
  दुबई, 23 ऑक्टोबर :  तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ही टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. सर्व अनिश्चित परिस्थितीवर मात करत अफगाणिस्तानची टीम वर्ल्ड कपसाठी दाखल झाली आहे. पात्रता फेरीतील मॅचमध्ये अफगाणिस्ताननं दोन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत सर्व टीमना धोक्याचा इशारा दिला आहे. देशातील अशांत परिस्थितीमुळे होरपळलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ही टीम जिवाची बाजी लावणार आहे. अफगाणिस्तानच्या टीममध्ये टी20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा बदल झाला. टीम निवडीत मत मांडण्याचा अधिकार न मिळाल्यानं राशिद खाननं (Rashid Khan) कॅप्टनसीचा राजीनामा दिला. त्याच्या जागी मोहम्मद नबीची (Mohammad Nabi) कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राशिद आणि नबी हे दोघं अफगाणिस्तानचे सर्वात अनुभवी टी20 खेळाडू आहेत. जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडं आहे. त्यामुळे त्यांचा फॉर्म अफगाणिस्तानसाठी निर्णायक राहणार आहे. बॉलिंग आणि बॅटींग या दोन्हीमध्ये नबी उपयुक्त असून राशिदकडंही शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमक खेळण्याची क्षमता आहे. अनुभवी अहमद शहजाद आणि हरजतउल्लाह जजाई या ओपनिंग जोडीवर टीमच्या बॅटींगची भिस्त असेल. रहमानुल्‍लाह गुरबाज, नजीबुल्‍लाह जदरान आणि असगर अफगान यांच्यावर अफगाणिस्तानच्या मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल. गुलबदीन नईब, नवीन उल हक आणि मुजीब उर रहमान हे उपयुक्त बॉलर्स अफगाणिस्तानकडं आहेत. या टीममध्ये अनेकांना धक्का देण्याची क्षमता आहे. ही क्षमता त्यांनी यापूर्वीही अनेकदा दाखवून दिली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक कोणत्याही टीमला परवडणारी नाही. अफगाणिस्तानची टीम (Afghanistan Squad) मोहम्मद नबी (कॅप्टन), अहमद शहजाद, हरजतउल्लाह जजाई, रहमानुल्‍लाह गुरबाज,  नजीबुल्‍लाह जदरान , असगर अफगान, राशिद खान, गुलबदीन नईब, नवीन उल हक, मुजीब उर रहमान, करीम जनत, फरीद अहमद, हमीद हसन,  उस्मान घानी आणि हसमतउल्लाह शाहिदी अफगाणिस्तानचे वेळापत्रक (Afghanistan Time Table) 25 ऑक्टोबर- अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड - संध्याकाळी 7.30 वाजता 29 ऑक्टोबर- अफगाणिस्तान विरुद्ध  पाकिस्तान - संध्याकाळी 7.30 वाजता 31 ऑक्टोबर- अफगाणिस्तान विरुद्ध  नामिबिया - दुपारी 3.30  वाजता 3 नोव्हेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध  भारत - संध्याकाळी 7.30 वाजता 7 नोव्हेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध  न्यूझीलंड  - दुपारी 3.30  वाजता ग्रुप-1 मधल्या टीम ग्रुप-1 मधल्या टीम वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका बांगलादेश ग्रुप-2 मधल्या टीम भारत पाकिस्तान न्यूझीलंड अफगाणिस्तान स्कॉटलंड नामिबिया  
  Published by:News18 Desk
  First published: