मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup साठी Pakistan सज्ज; भारताला हरवण्याचे स्वप्न यंदातरी पूर्ण होणार?

T20 World Cup साठी Pakistan सज्ज; भारताला हरवण्याचे स्वप्न यंदातरी पूर्ण होणार?

Team Pakistan

Team Pakistan

प्रबळ दावेदार ठरलेल्या टीम इंडियाला हरवण्याचे स्वप्न उराशी बाळगुन टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup)स्पर्धेच्या मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने 15 सदस्यांची घोषणा केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 23 ऑक्टोबर : प्रबळ दावेदार ठरलेल्या टीम इंडियाला हरवण्याचे स्वप्न घेऊन वर्ल्ड कप T20 World Cup स्पर्धेच्या मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने 15 सदस्यांची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कपला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नुकतचं आपल्या संघात तीन बदल केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपल्या अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत.

यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.

पाकिस्तानचे स्टार उत्तम फॉर्ममध्ये

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने यूएईमध्ये आतापर्यंत 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून एकही पराभूत झालेला नाही. त्यासोबतच इमाद वसीमने 11, हसन अलीने 9, उपकर्णधार शादाब खानने 8 आणि आसिफ अलीसह फखर जमानने प्रत्येकी 6-6 सामन्यात पराभवाचा तोंड पाहिलेल नाही. तर शाहिन आफ्रिदीने 4 तर मोहम्मद नवाबने 3 टी20 सामने युएईत जिंकले आहेत. या खेळाडूंनी विश्वचषक होणाऱ्या युएईमधील मैदानात पराभव पाहिलेलाच नसल्याने भारतासाठी त्यांना पराभूत करण एक मोठं आव्हान असणार हे नक्की.

ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु देखील झाला आहे. तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्याआधी सुपर 12 मधील संघ सराव सामने खेळले आहेत. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी असून पाकिस्तानला एका सराव सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील.

टी20 वर्ल्ड कपमध्ये या स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व 5 मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे, प्रबळ दावेदार ठरलेल्या टीम इंडियाला हरवण्याचे स्वप्न यंदातरी पाकिस्तान संघ पूर्ण करेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पाकिस्तानची टीम (Pakistan Squad)

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, सरफराज अहमद, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, फखर जमान, मोहम्मद हफीज, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : खुशदिल शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

पाकिस्तानचं वेळापत्रक

24 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध भारत, सायंकाळी 7: 30वाजता

26 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30वाजता

29 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30वाजता

2 नोव्हेंबर- पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30वाजता

7 नोव्हेंबर- पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7.30 वाजता

ग्रुप-1 मधल्या टीम

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

बांगलादेश

ग्रुप-2 मधल्या टीम

भारत

पाकिस्तान

न्यूझीलंड

अफगाणिस्तान

स्कॉटलंड

नामिबिया

First published:

Tags: India vs Pakistan, Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup