मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : तोफखान्यांशिवाय मैदानात उतरणार England, वनडेनंतर टी-20 वर्ल्ड कपही जिंकणार!

T20 World Cup : तोफखान्यांशिवाय मैदानात उतरणार England, वनडेनंतर टी-20 वर्ल्ड कपही जिंकणार!

 यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 2019 मध्ये वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंडची टीम (England Team) या स्पर्धेसाठी फेव्हरेट मानली जात आहे, पण जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या तोफखान्यांशिवाय इंग्लंड मैदानात उतरणार आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 20 ऑक्टोबर : यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सर्वच देशांच्या टीम या क्रिकेट महाकुंभासाठी सज्ज झाल्या आहेत. वर्ल्ड कप जिंकून आपलीच टीम जगात सर्वोत्तम असल्याचं सिद्ध करण्यासाठी सगळेच देश उत्सुक आहेत. 2019 मध्ये वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंडची टीम (England Team) या स्पर्धेसाठी फेव्हरेट मानली जात आहे, पण जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या तोफखान्यांशिवाय इंग्लंड मैदानात उतरणार आहे.

इऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) कॅप्टनशीप खाली इंग्लंडने वन-डे वर्ल्ड कप जिंकला असला तरीही टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांची कामगिरी कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. पण त्यांचं मनोबल उच्च असेल हे मात्र नक्की. भारतात होणारा हा वर्ल्ड कप या वर्षी यूएई आणि ओमानमध्ये होत आहे. जॉस बटलर आणि जेसन रॉय हे इंग्लंडला चांगली ओपनिंग (Opening Batsman) करून देऊ शकतात. बटलर आणि रॉय दोघांनीही बॅटिंगमधून त्यांचं महत्त्व अनेकदा सिद्ध केलं आहे. भारताविरुद्धही त्यांची कामगिरी चांगली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मलान बॅटिंगला येणं जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे त्या जागी दुसऱ्या नावाची चर्चा करण्याची गरजच नाही.

मीडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी टी-20 सामन्यात समतोल राखून खेळायचं असतं. इंग्लंडच्या मीडल ऑर्डरची (Middle Order) तीच तर खासियत आहे. विकेट पडल्या तरीही मीडल ऑर्डरचा बॅट्समन एका बाजूने डाव लावून धरतो. जर ओपनर्सनी चांगली सुरुवात करून दिली तर चांगला स्कोअर करायला मीडल ऑर्डरची मदत होते. चौथ्या क्रमांकावर जॉनी बेअरस्टोव्ह उत्तम आहे.

डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ख्रिस जॉर्डन, मोईन अली, आदिल रशीद असे दमदार बॉलर्स (Bowling Attack) इंग्लंडच्या टीममध्ये आहेत त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी गोलंदाजी करून ते इंग्लंडचं रक्षण करतील. स्पिनर मोईल अली आणि आदिल रशीद यांना इथल्या खेळपट्ट्या पोषक असल्याचं बोललं जातंय त्यामुळे इंग्लंडची बाजू बळकट आहे. वूडची वेगवान बॉलिंग जबरदस्त पडत आहे तसंच रेसी टॉपले पण इंग्लंड संघासोबत आहे. त्यामुळे कॅप्टन मॉर्गन त्याचाही वापर योग्य वेळी करू शकेल.

जो रूटला या स्पर्धेसाठी इंग्लंड टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. रूटने वन-डे आणि टेस्ट मॅचेसमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 32 टी-20 सामन्यांत 35 च्या स्ट्राइक रेटने 893 रन्स केल्या असूनही त्याला या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. रूटच्या जागी सॅम बिलिंग्जची टी-20 संघात निवड करण्यात आली असून सॅमनेही चांगली कामगिरी केली आहे.

त्यामुळे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये (Departments) जागतिक स्तरावर उच्च कामगिरी केलेल्या खेळाडूंनी इंग्लंड टीम सजली आहे. जगज्जेतेपदाचा आत्मविश्वासही त्याच्या जोडीला आहे. मॉर्गनचं नेतृत्व इंग्लंडला टी-20 वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवून देतंय का हे लवकरच स्पष्ट होईल.

इंग्लंडची टीम (England Squad)

इऑन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली. जॉनी बेअरस्टोव्ह, सॅम बिलिंग्ज, जॉस बटलर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लायम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस व्होक्स, मार्क वूड

इंग्लंडचं वेळापत्रक (England Schedule)

23 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज- संध्याकाळी 7.30 वाजता

27 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर बांगलादेश- दुपारी 3.30 वाजता

30 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- संध्याकाळी 7.30 वाजता

1 नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर श्रीलंका- संध्याकाळी 7.30 वाजता

6 नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- संध्याकाळी 7.30 वाजता

ग्रुप-1 मधल्या टीम

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

बांगलादेश

ग्रुप-2 मधल्या टीम

भारत

पाकिस्तान

न्यूझीलंड

अफगाणिस्तान

स्कॉटलंड

नामिबिया

First published:

Tags: England, T20 world cup