मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : तिसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी West Indies सज्ज, हे खेळाडू सगळ्यात धोकादायक

T20 World Cup : तिसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी West Indies सज्ज, हे खेळाडू सगळ्यात धोकादायक

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. 14 नोव्हेंबरला या स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. गतविजेती वेस्ट इंडिज (West Indies Squad) पुन्हा एकदा यंदाही धमाका करण्यासाठी सज्ज आहे.

दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. 14 नोव्हेंबरला या स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. गतविजेती वेस्ट इंडिज (West Indies Squad) पुन्हा एकदा यंदाही धमाका करण्यासाठी सज्ज आहे. वेस्ट इंडिजची टीम यावेळी ग्रुप एमध्ये आहे. वेस्ट इंडिजसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या ग्रुपमध्ये असल्यामुळे हा ग्रुप म्हणजे ग्रुप ऑफ डेथ असल्याचं बोललं जात आहे.

वेस्ट इंडिजच्या टीममध्ये क्रिस गेल, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, शिमरन हेटमायर, एव्हीन लुईस यांच्यासारखे पॉवर हिटर आहेत. टी-20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या टीममध्ये वेस्ट इंडिजने सर्वाधिक सामने जिंकले आहेत, तसंच त्यांच्या नावावर दोन टी-20 वर्ल्ड कप आहेत. 2012 सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध वेस्ट इंडिजचा 36 रननी तर 2016 साली इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजने 4 विकेटने विजय मिळवला होता.

वेस्ट इंडिजची टीम (West Indies Squad)

क्रिस गेल, एव्हिन लुईस, लेंडल सिमन्स, शिमरन हेटमायर, कायरन पोलार्ड, ड्वॅन ब्राव्हो, आंद्रे रसेल, रोस्टन चेस, निकोलस पूरन, आंद्रे फ्लेचर, अकील हुसेन, ओबेड मॅकॉय, रवी रामपॉल, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श

वेस्ट इंडिजचं वेळापत्रक (West Indies Schedule)

23 ऑक्टोबर- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड- संध्याकाळी 7.30 वाजता

26 ऑक्टोबर- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुपारी 3.30 वाजता

29 ऑक्टोबर- वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश- दुपारी 3.30 वाजता

4 नोव्हेंबर- वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका- संध्याकाळी 7.30 वाजता

ग्रुप-1 मधल्या टीम

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

बांगलादेश

ग्रुप-2 मधल्या टीम

भारत

पाकिस्तान

न्यूझीलंड

अफगाणिस्तान

स्कॉटलंड

नामिबिया

First published:

Tags: T20 world cup, West indies