मुंबई, 18 सप्टेंबर : शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अडीच वर्षात कधी बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर", अशी टीका रामदास कदम यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार, विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विवामान विभागाने वर्तवली आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा. रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर मोठा बॉम्ब “शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना माहित आहे. कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा शंभर खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. अडीच वर्षात कधी बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर”, अशी टीका रामदास कदम यांनी केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नांदेडमध्ये पोलीस भरती विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की केल्याच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.. नांदेडमध्ये पोलीस भरती प्रशिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्काबुक्की केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर तिथं लाठीचार्ज झाल्याचंही वृत्त होतं. प्रत्यक्षात तिथं काय घडल? यावर आता खुद्ध फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांवर कारवाई होणारच? चंद्रकांत हंडोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार भाई जगताप यांच्याऐवजी चंद्रकांत हंडोरे यांच्यावर सोपवण्याच्या तयारीत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आता दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यावी, असा पेच मुंबई महापालिका प्रशासनासमोर उभा आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या पुण्यातील धायरी परिसरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नाशिकमध्ये बिबट्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद देवळाली कॅम्पच्या बार्न्सस्कूल रोडवर शुक्रवारी पहाटे बिबट्याने एका बंगल्यात प्रवेश केला. तिथे त्याने असलेल्या एका पाळीव श्वानावर झडप घेत त्याला नेले असल्याची घटना घडली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार, विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबईसह उपनगरात पावसाने मागच्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.