पुणे, 17 सप्टेंबर : नांदेडमध्ये पोलीस भरती प्रशिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्काबुक्की केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर तिथं लाठीचार्ज झाल्याचंही वृत्त होतं. प्रत्यक्षात तिथं काय घडल? यावर आता खुद्ध फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे येथे 12व्या छात्र संसदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांनी फडणवीस यांचा उल्लेख केला युवा मुख्यमंत्री म्हणून केला. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर स्थगितीमुळे एमआयडीसीत 138 प्रकल्प अडकल्याचे आरोप विरोधक करत आहे. यावर बोलताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणीवस म्हणाले की, विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कोणतीही माहिती न घेता ते बोलत आहे. अशा विरोधकांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नाही. जलयुक्त शिवाराच्या ज्या चौकशी सुरू होत्या. त्या आता बंद होणार का? जिथे गडबड आहे, ती कोणतीही चौकशी थांबणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी राजकीय हेतू असेल, अशा चौकशी बंद केल्या जाणार आहे. वाचा - पुन्हा 100 कोटींचा आरोप, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर मोठा बॉम्ब नांदेडमध्ये असा प्रकार घडला नाही : फडणवीस पोलीस भरती प्रशिक्षकांनी नांदेडमध्ये धक्काबुक्की केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मला माहीत नाही, कोणती माध्यमं तिथं होती. मात्र, मला कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नाही. तिथं कुठलाही लाठीचार्ज झाला नाही. पोलीस भरतीची मागणी ते करत होते. मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की पोलीस भरती आम्ही करणार आहोत. त्यानंतर मी तिथून निघालो, कोणीही तिथं धक्काबुक्की केली नाही किंवा कुठलाही लाठीचार्ज झाला नाही. अजित पवारांकडे भरपूर वेळ : फडणवीस विरोधी पक्षनेते अजित पवार सारखे आरोप करत राहतात, त्यांना भरपूर वेळ आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मला वेळ नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. नाना पटोले यांना असे झटके येतात : फडणवीस काँग्रेने नेते नाना पटोले पुण्यात म्हणाले, की भय आणि भष्ट्राचाराच्या जोरावर भाजप लोकशाही विकत घेतंय. यावर नाना पटोले यांना असे झटके येत असतात. ते काहीही बोलतात, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.