प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा मिळालेल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन सुरू केलेला पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे संघर्ष; शिवसेना म्हणजे जहाल आणि आक्रमक भूमिका, अशी प्रतिमा बाळासाहेबांनी आपल्या कृतीतून, आपल्या भाषणांतून, आपल्या चळवळींमधून तयार केली; मात्र शिवसेनेचा वारसा पुढे ज्यांच्याकडे आला त्या उद्धव ठाकरेंची ओळख मात्र मवाळ आणि मितभाषी नेता अशी होती. त्यामुळेच 2003 साली जेव्हा शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं, तेव्हा सर्वत्र याच मुद्द्यावरून चर्चा होत होती.