कट्टर शिवसैनिक, शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते म्हणून ज्यांची ओळख होती त्यांनी जून 2022मध्ये शिवसेनेत सर्वांत मोठं बंड केलं आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा वेगळ्याच समीकरणाने तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लावला. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या या भूकंपाला कारणीभूत होते (Eknath Shinde) एकनाथ शिंदे. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं; पण शिवसेनेत अलीकडे ते नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. अखेर या नाराजीचा उद्रेक होऊन त्यांनी बंड केलं. ठाण्यातल्या शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या राजकीय ध