मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sindhudurg, India

सिंधुदुर्ग, 17 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सावंतवाडीतील व्यापाऱ्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून व्यापार आणि उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. ही घटना सायंकाळी राष्ट्रवादी कार्यालय येथे घडली. संशयितांमधील एक जण व्यापारी आहे. त्यावरूनच हा प्रकार घडल्याच समोर येत आहे. दरम्यान, याबाबत तक्रार देण्यासाठी पुंडलिक दळवी यांनी पोलीस ठाणे गाठले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. तर मारहाण करणाऱ्यांपैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान, सावंतवाडी शहराचा आदर्श इतर तालुके ठेवत असतात, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांच असं हे शहर आहे. असं असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या घरात घुसून कार्यालयात बसले असताना त्यांच्यावर हल्ला केला. यात पक्षीय कोणतेही मतभेद नसताना केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाचा वापर करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी दळवी एकटे असताना जमाव करून हल्ला केला. या लोकांचा पुर्व इतिहास तपासून गुन्हे दाखल करण्यात यावे, मारहाण करताना संबंधित हे मद्याच्या नशेत होते असा आरोप राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.

(काँग्रेसच्या 'त्या' आमदारांवर कारवाई होणारच? चंद्रकांत हंडोरे यांचं मोठं विधान)

सावंतवाडीची ओळख हे अंमली पदार्थांच किंवा मद्याच शहर, चोरट्या मद्याची वाहतूक अशी होत आहे ती पुसुन काढण्याची वेळ आहे. पोलिस प्रशासनाने अशा लोकांवर कारवाई करत ती पुसून टाकावी असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले. आम्ही सर्वजण देखील संघर्षातून तयार झालेले आहोत. राजकीय संघर्ष आम्हाला नवीन नाही. परंतू चुकीच्या कारणासाठी समाजात स्थान असणाऱ्या एखाद्या पक्षाच्या तालुकाध्यक्षाला वैयक्तिक कारणासाठी पक्षीय ढाल करून हल्ला होण चुकीच आहे. अशा लोकांनी एकटे असताना हल्ला केला म्हणजे आपण जिंकलो अस वाटत असेल परंतू असा प्रकार करण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास जशास तस प्रत्यूत्तर दिल जाईल अस संजू परब यांनी सांगितले आहे.

First published:

Tags: Attack, Sindhudurg news