नाशिक, 17 सप्टेंबर : दारणा काठच्या शिवारात नुकतेच दोन बिबटे जेरबंद झाले तरी अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. देवळाली कॅम्पच्या बार्न्सस्कूल रोडवर शुक्रवारी पहाटे बिबट्याने एका बंगल्यात प्रवेश केला. तिथे त्याने असलेल्या एका पाळीव श्र्वानावर झडप घेत त्याला नेले असल्याची घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबट्याने बंगल्यात मारलेली झडप आणि कुत्र्यास घेवून पळून जाण्यासाठी मारलेली झडप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, बार्न्स स्कूल व मळे परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याने नागरीकांना सकाळ-सायंकाळ फिरणे कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या परिसरात घडली त्याजवळच असलेल्या लहवित परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत आहे. बिबट्याने गोठ्यातील जनावरे, छोटी वासरे फस्त केले आहे. त्यामुळे रात्री घराबाहेर निघणे मुश्किल झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या बार्न्स स्कूल परीसरात बिबट्याने केले कुत्रा फस्त, बिबट्याच्या हालचाली कॅमेरात कैद #leopard #CCTV pic.twitter.com/dLzVov5gfN
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
(ती तरफडत राहिली, किंचाळली, आठ नराधमांनी पिस्तूल रोखत लचके तोडले, व्हिडीओ बनवला आणि....)
बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झालीय. बार्न्स स्कूल रोडवरील डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात प्रवेश करत त्यांच्या पाळीव श्वाणावर हल्ला करून त्याला नेल्याची घटना सीसीटिव्ही कॅमेरे कैद झाली आहे. त्यांनी संबंधित घटनेची महिती वनविभागाला दिली आहे. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.