मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती

पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती

महेश हा मूळचा कोल्हापूर येथील होता.

महेश हा मूळचा कोल्हापूर येथील होता.

महेश हा मूळचा कोल्हापूर येथील होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 17 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातूनही याप्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. पुण्यातील धायरी परिसरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

महेश राजाराम तवंडे (वय 32, ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, तरी त्याने नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महेश हा मूळचा कोल्हापूर येथील होता. मात्र, तो पुण्यामध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करत होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दरम्यान, त्याची मैत्रीण गणपती उत्सवापासून बाहेरगावी गेली होती. त्यामुळे तो एकटाच रुममध्ये होता. शुक्रवारी त्याने फ्लॅट आतून बंद करुन स्वतःच्याच हाताने शरीरावर व गळ्यावर वार केले.

घरमालकाने पोलिसांना दिली माहिती -

दुपारी घरमालकाला याठिकाणी ओरडण्याचा आवाज आला होता. मात्र, नेहमीच या तरुणाच्या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत असल्यामुळे त्यांनी या ओरडण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - मैत्रिणीसमोर मारहाण करुन अपमानित केले, पुण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

यावेळी त्यांनी आतून बंद असलेला फ्लॅटचा दरवाजा तोडला असता महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Pune crime news, Relationship