JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 50 हजारपेक्षाही कमी किमतीत तयार होणार व्हेंटिलेटर, पुण्यातील युवा इंजिनियरची जबरदस्त कामगिरी

50 हजारपेक्षाही कमी किमतीत तयार होणार व्हेंटिलेटर, पुण्यातील युवा इंजिनियरची जबरदस्त कामगिरी

नोक्का रोबोटिक प्रायवेट लिमिटेड संस्थेचे को-फाऊंडर निखिल कुरेले यांनी कमी किमतीतील व्हेंटिलेटर्सची निर्मिती करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 02 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस आकड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज कोरोनाग्रस्तांची संख्या देशात 1900 वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण 338 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले असून पुण्यात 2 आणि बुलडाण्यात एक रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी चांगले आणि कमी किमतीतील उपचार उपलब्ध व्हावे यासाठी पुण्यात एका संस्थेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. नोक्का रोबोटिक प्रायवेट लिमिटेड संस्थेचे को-फाऊंडर निखिल कुरेले यांनी कमी किमतीतील व्हेंटिलेटर्सची निर्मिती करत आहे. याची किंमत 50 हजारपेक्षा कमी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनासारख्या महाकाय साथीच्या रोगात हे व्हेंटिलेटर्स अनेक नागरिकांचे जीव वाचवू शकतात असा विश्वास युवा इंजिनियर निखिल यांनी व्यक्त केला आहे. हे वाचा- तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी

निखिल हे पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीत काम करतात. ह्या कंपनीत पाण्याविना चालणारे रोबोट तयार केले जातात. ह्या कंपनीने कोरोनाग्रस्तांसाठी खास कमी किमतीमध्ये व्हेंटिलेटर बनवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. नोक्का रोबोटिक्स या कंपनीची मागच्या वर्षीची उलाढाल फक्त 27 लाख रुपये होती. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि एरोस्पेस अभियंता नोक्का रोबोटिक्समध्ये काम करतात. सध्या भारतात फक्त 40 हजारहून अधिक व्हेंटिलेटर आहेत. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता आणि या महाकाय संकटाचा सामना करण्यासाठी आणखी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे नागरिकांना कमी किमतीमध्ये जर हे उपलब्ध झाले तर त्यांचा जीव वाचण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. हे वाचा- …तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या