Home /News /videsh /

...तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती

...तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती

अमेरिका - आतापर्यंत 1,64,610 नागरिकांना लागण आणि 3173 मृत्यू. जगात सर्वाधिक संसर्ग याच देशात झाले आहेत.

अमेरिका - आतापर्यंत 1,64,610 नागरिकांना लागण आणि 3173 मृत्यू. जगात सर्वाधिक संसर्ग याच देशात झाले आहेत.

डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहानपासून हा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. युरोप, अमेरिकेत कोरोनाने धुमशान घातले आहे.

    जिनिव्हा, 02 एप्रिल: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. तब्बल 9 लाख 35 हजाल 817 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 47 हजाल 208 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र येत्या काळात हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता जागितक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, कोरोनाव्हायरस सर्व जगभर झपाट्याने पसरेल. त्यामुळे एका आठवड्यात मृत्यूची संख्या दुपटीने वाढली, अशी भीती व्यक्त केली. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी कोविड-19 येथे लढा देण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले. टेड्रॉस यांनी यावेळी, "कोरोनाव्हायरस पसरून चार महिने झाले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक महिन्यात संसर्ग जलद गतीन आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी आम्ही जगभरातील शास्त्रज्ञांशी संवाद साधत आहोत", असे सांगितले. तर, जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल अॅडव्हायझर मॅथ्यू ग्रिफिथ यांनी, "एखादा देश कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित असेल, अशी WHO अपेक्षा करत नाही. कारण कोरोनाव्हायरस कुठेही पसरू शकतो.काही देश आणि क्षेत्रांमध्ये कोरोनाव्हायरस कमी होतो आहे, मात्र त्या ठिकाणाहून इतर नवीन ठिकाणी त्याचा उद्रेक होणं चिंतेची बाब आहे. सध्या फक्त युरोपवर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे, मात्र इतर क्षेत्रामध्येही त्याचा उद्रेक होऊ शकतो", अशी भीती व्यक्त केली आहे. वाचा-तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहानपासून हा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. युरोप, अमेरिकेत कोरोनाने धुमशान घातले आहे. एकट्या युरोपात 30 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स येथील मृतांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर कोरोनाचे नवे केंद्र तयार झाले आहे. वाचा-Coronavirus : कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी सज्ज राहा - WHO कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका कम्युनिटी ट्रान्समिशनचा (community transmission) सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवं, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे क्षेत्रीय संचालक ताकेशी कसाई (Takeshi Kasai) म्हणाले, "आशिया आणि पॅसिफीक क्षेत्रापासून कोरोनाव्हायरसचा उद्रेक दूर असला तरीदेखील हा लढा दीर्घकाळ चालणार आहे. जोपर्यंत ही महासाथ कायम आहे तोपर्यंत कितीही उपाययोजना केल्या तरीदेखील हा धोका टळणार नाही. त्यामुळे प्रत्येक देशानं मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहण्याची गरज आहे"
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या