Home /News /national /

तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

जमातने गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हा कार्यक्रम भारतातील कोरोनाव्हायरसचे केंद्र झाले आहे.

    नवी दिल्ली, 02 एप्रिल : निजामुद्दीनमध्ये तब्लिगी परिषदेतने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या परिषदेत देशातील विविध राज्यांतली आणि परदेशातली लोकं उपस्थित होती. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या परिषदेमुळे तब्बल 9 हजार लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. या परिषदेस किमान 7 हजार 600 भारतीय आणि 1 हजार 300 परदेशी लोक उपस्थित होते असा अंदाज वर्तवला जात आहे. जमातने गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हा कार्यक्रम भारतातील कोरोनाव्हायरसचे केंद्र झाले आहे. तब्लिगी जमातमधील सदस्यांची ओळख अद्याप सुरू झाल्यामुळे सदस्यांची संख्याही वाढू शकते. देशभरातील अन्य जमात देशातील 1 हजार 306 सदस्यांची ओळख पटली जात आहे. गृहमंत्रालयाने एकत्रित केलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपर्यंत 1 हजार 051 लोकांना अलग ठेवण्यात आले आहे. 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. वाचा-Coronavirus च्या निदानासाठी लवकरच ब्लड टेस्ट, भारतातील रुग्णांचा खरा आकडा समजणार तब्लिगी जमातमधील 7 हजार 688 कार्यकर्त्यांची ओळख केली जात आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील सर्वात जास्त 190, आंध्र प्रदेशातील 71, दिल्लीत 53, तेलंगणामध्ये 28, आसाम 13, महाराष्ट्रातील 12, अंदमानमध्ये 10, जम्मू-काश्मीर 6, गुजरात आणि पुडुचेरीमधील प्रत्येकी एकाचा शोध घेण्यात आला आहे. वाचा-Coronavirus : कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी सज्ज राहा - WHO क्वारंटाइनकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तणूक तब्लिगी जमातमध्ये सामिल झालेल्या शेकडो लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान क्वारंटाईनमध्ये असलेले हे लोकं वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाईट पद्धतीने वागत असल्याची माहिती रेल्वेच्या सीपीआरओ यांनी दिली. ते म्हणाले, क्वारंटाइनमधील या व्यक्ती खाण्याच्या अवाजवी मागण्या करीत आहेत. ते वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरव्यवहार करीत आहेत. त्यांच्याशी वाईट पद्धतीने वागत आहेत. ते सर्वत्र थुंकत आहेत. इतकचं नाही तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकतात. याशिवाय ते हॉस्टेल इमारतीच्या भागात फिरत आहेत. याबाबतची माहिती दिल्लीच्या दक्षिण पूर्व डीएमना सांगण्यात आले आहे. वाचा-10 दिवस श्वासाशी संघर्ष; तरुणाने जिंकला कोरोनाविरोधात लढा, म्हणाला... तब्लिगी म्हणजे काय तबलीघीचा अर्थ शिक्षणाचे आणि मुख्य कार्यालयाचे रूपांतर धर्माचा विस्तार करणे. निजामुद्दीनमध्ये असलेले हे केंद्र मुस्लिमांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान येथे मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होती. यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या वेळी येथे 1500 लोक उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या