जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्याचा माहिती नसलेला इतिहास, 140 वर्षांपासून ‘या’ गल्लीनं जपली परंपरा, एकदा पाहा Video

पुण्याचा माहिती नसलेला इतिहास, 140 वर्षांपासून ‘या’ गल्लीनं जपली परंपरा, एकदा पाहा Video

पुण्याचा माहिती नसलेला इतिहास, 140 वर्षांपासून ‘या’ गल्लीनं जपली परंपरा, एकदा पाहा Video

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या वस्तीनं 140 वर्षांपासून आपली परंपरा जपली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 29 जुलै : शिक्षणाचं माहेरघर, आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यानं आजही जुन्या आठवणी जपल्या आहेत. पुणे शहरात फिरताना जागोजागी याची उदहारणं दिसतात. शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या मंडईच्या मागच्या बाजूला एक छोटीशी गल्ली आहे. बुरुडअळी अशी ओळख असेल्या या भागात बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या कारागिरांच्या पिढ्यानं सतराव्या शतकांपूर्वी पुण्यात वास्तव्याला सुरुवात केली होती. देवी पार्वतीला वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना फुलांसाठी बांबूची परडी यांच्या पूर्वजांनी बनवली होती, अशी दंतकथा सांगितली जाते. तेव्हापासून त्यांनी हा व्यवसाय स्विकारला. 1885 साली मंडईच्या स्थापनेनंतर बुरूड आळीचाही विकास झाला. . मराठी आणि कन्नड भाषा बोलणारी ही कुटुंबे या लघुउद्योगावर परिवाराची गुजराण करतात.

News18लोकमत
News18लोकमत

बुरुड अळीतील जेष्ठ कारागीर जनार्धन मोरे यांनी  दिलेल्या माहितीनुसार, ‘गणपतीच्या दिवसांमध्ये आरास, दसऱ्यात घटस्थापनेला देवीच्या परड्या, दिवाळीला आकाशदिवे अशा त्या-त्या सणाप्रमाणे बांबूच्या वस्तू रास्त दरात इथे मिळतात. काही कुटुंबांतील व्यक्ती तयार वस्तू मंडईच्या पुढच्या बाजूला, तुळशीबागेजवळही विक्रीसाठी घेऊन बसतात. पुणे जिल्हा बुरुड समाज संस्थेची स्थापना 1988 साली झाली. बांबूचे वेगवेगळे औषधी उपयोग, धार्मिक महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता लक्षात घेऊन उत्पादनात वैविध्य कसे आणता येईल, बांबूपासून कागद आणि कापड निर्मिती असे काही कालानुरूप प्रयोग करण्याचे प्रयत्न ही संस्था करते. पुणेकरांचा नाद खुळा! 10 किलो वजनाचं तयार केलं पैंजण, पाहा किती आहे किंमत, Video कारागिरांच्या उत्पादनाला उठाव आणि नव्या पिढीला या व्यवसायात आणण्यासाठी प्रशिक्षण आणि उत्तेजन देण्याचीही त्यांची योजना आहे. त्यासाठी लागणारा बांबू पुणे जिल्ह्यातील मावळ, वेल्हा, भोर प्रांतात, कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच तो बाहेरच्या राज्यातून आयातही होतो. हस्तकलेचा वारसा जपणारी पुण्यातील ‘बुरुड आळी’ला पुणेकरांनी एकदा तरी भेट द्यायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात