नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : अँड्रॉईड फोन युजर्ससाठी (Android Users) महत्त्वाची माहिती आहे. आता Google 2.3.7 किंवा त्याहून कमी वर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनवर गुगल साइन-इन सपोर्ट करणार (Google Sign-in) नाही. हे बदल 27 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. जुन्या अँड्रॉईड फोन युजर्सला सर्व Google Apps चालू ठेवण्यासाठी कमीत-कमी अँड्रॉईड 3.0 हनीकॉम्बमध्ये अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईड 2.3 वर्जन (Android 2.3) वापरणारे युजर्स 27 सप्टेंबरपासून आपल्या डिव्हाईसवर गुगल अकाउंट लॉगइन करू शकणार नाहीत. गुगलचं Android 2.3 ऑपरेटिंग सिस्टम डिसेंबर 2010 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता ते अधिकच जुनं झाल्याने या 2.3 वर्जनवर Google Apps सुरू होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. YouTube, Google Play Store, Google maps, Gmail, Google कॅलेंडर हे अॅप जुन्या वर्जनमध्ये काम करणार नाहीत. या सर्विसेजमध्ये साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना एरर येईल.
27 सप्टेंबरपासून अँड्रॉईड वर्जन 2.3.7 आणि त्याहून कमी वर्जनवर चालणाऱ्या फोनवर युजर्स ज्यावेळी Google Apps मध्ये साइन-इन करण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी त्यांना ‘username error' किंवा 'password error’ दिसेल. हा ईमेल अद्यापही अतिशय जुनं अँड्रॉईड वर्जन, सॉफ्टवेअर वर्जन वापरणाऱ्या युजर्सला पाठवण्यात आला आहे. अशा युजर्सला सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी किंवा फोन स्वीच करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. सध्या अशा युजर्सची संख्या अतिशय कमी आहे, जे अँड्रॉईडच्या अतिशय जुन्या वर्जनचा वापर करत आहेत.
Google ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ग्राहकांची सुरक्षा पाहता जुन्या प्लॅटफॉर्म्सवरील सपोर्ट परत घेत आहे. कंपनी अनेकदा अँड्रॉईड सॉफ्टवेअरच्या जुन्या वर्जनमधून सपोर्ट परत घेत असते.
ऑपरेटिंग सिस्टमचे जुने वर्जन बग्स आणि हॅकर्सच्या विळख्यात सहज येऊ शकतात. त्यामुळेच कंपनीकडून ही पावलं उचचली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.