Home /News /technology /

Gmail चे हे फीचर्स माहितीयेत का? विना इंटरनेटही पाठवता येतील Mails, पाहा प्रोसेस

Gmail चे हे फीचर्स माहितीयेत का? विना इंटरनेटही पाठवता येतील Mails, पाहा प्रोसेस

जीमेलवर विना इंटरनेट Mails सर्च करता येतात, वाचता येतात आणि त्याला उत्तरंही देता येतात. हे फीचर केवळ Chrome वर काम करतं.

  नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : ऑफिसच्या कामांपासून ते खासगी कामांपर्यंत सर्वांनाच आपल्या ईमेल आयडीची (Email ID) गरज असते. ईमेल आयडीमध्ये सर्वात प्रचलित आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म Google चं Gmail आहे. Gmail मध्ये युजर्सला अनेक फीचर्स मिळतात, ज्यामुळे मेल पाठवण्यासह इतरही काम सोपी होतात. विना इंटरनेट असे पाठवा मेल्स - एखाद्या ठिकाणी नेटवर्कची समस्या असेल, डेटा पॅक-wifi काम करत नसेल, तर तुमचं काम न थांबण्यासाठी Gmail एक फीचर देतं. जीमेलवर विना इंटरनेट Mails सर्च करता येतात, वाचता येतात आणि त्याला उत्तरंही देता येतात. हे फीचर केवळ Chrome वर काम करतं. या फीचरसाठी mail.google.com बुकमार्क करा. सेटिंगमध्ये ऑफलाइन ऑप्शनवर क्लिक करा आणि ऑफलाइन मेलचा पर्याय एनेबल करा. शेड्यूल मेल - Gmail मध्ये मेल शेड्यूल करण्याचाही पर्याय मिळतो. मेल लिहून तो वेळेत पाठवण्याची सुविधा यात मिळते. मेल लिहून झाल्यानंतर सेंड पर्यायाच्या बाजूला दोन अॅरोवर क्लिक करा आणि शेड्यूल सेंडवर क्लिक करा. तिथे मेल कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी पाठवायचा आहे, ते सेट करा. जुना Mail कसा शोधाल? स्क्रोल करुन जुना मेसेज शोधणं अतिशय कठीण ठरतं. अशावेळी जीमेल सर्च फीचर कामी येईल. याद्वारे कोणताही मेल सेंडर, रिसीव्हर आणि मेलच्या कीवर्ड्सने शोधता येतात.

  Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस

  त्याशिवाय जीमेलवर असे अनेक फीचर्स आहे, ज्याद्वारे काम अधिक सोपं होईल. रीकॉल टाइम 5 ते 30 सेकंदपर्यंत वाढवणं, रिमाइंडरसाठी Gmail Nudges चा वापर करणं, लवकर ईमेल लिहिण्यासाठी स्मार्ट कंपोज फीचरचा वापर करणं अशा फीचर्समुळे काम करणं अधिक सोपं ठरू शकतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gmail, Google, Tech news

  पुढील बातम्या