नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : Google वर तुम्हाला तुमचे फोटो आणि व्हिडीओ लॉक करायचे असल्यास, गुगल एक खास फीचर आणणार आहे. गुगल आपल्या प्रोडक्टर Google Photos मध्ये या खास फीचरची सुविधा आणणार आहे. युजर्ससाठी लॉक फोल्डर फीचर (Lock Folder Feature) रोलआउट केलं जाण्याची घोषणा कंपनीने केली आहे. याच्या मदतीने अँड्रॉईड युजर्स आपले फोटो-व्हिडीओ लपवू शकतात.
सर्चमध्ये दिसणार नाही फोटो -
या फीचरच्या मदतीने युजर्स जे फोटो आणि व्हिडीओ हाइड करतील, ते App च्या मेन ग्रिड आणि सर्च शोमध्ये दिसणार नाहीत. कंपनीने या फीचरच्या लाँचिंगबाबत खुलासा केलेला नाही. परंतु Google ने ट्विट करत युजर्स Google Photos मध्ये कशाप्रकारे आपले फोटो-व्हिडीओ हाइड करू शकतील, याबाबत माहिती दिली आहे.
हे फीचर Google Pixel वर लाँच होईल आणि त्यानंतर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये लाँच होईल. या फीचरद्वारे युजर फोटो-व्हिडीओ सहजपणे लपवू शकतील.
स्क्रिनशॉट घेता येणार नाही -
Google Photos च्या या फीचरमध्ये पासकोडद्वारे लॉक केल्यानंतर ते कोणीही पाहू शकत नाही. या फोटोजचे कोणतेही स्क्रिनशॉट घेता येणार नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे.
कसा करता येईल या फीचरचा वापर?
- या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात आधी Google Photos च्या Library मध्ये जावं लागेल.
- Library मध्ये Utilities वर टॅप करावं लागेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर Locked Folder पर्याय दिसेल.
- यात युजर फोटो-व्हिडीओ पासकोडद्वारे लॉक करू शकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.