मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google चं नवं अपडेट! तुमच्या Android Phone मध्ये मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Google चं नवं अपडेट! तुमच्या Android Phone मध्ये मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Google ने Android 12 च्या लाँच आधी आपल्या Android OS साठी मोठ्या अपडेटची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फीचर्स असणार आहेत.

Google ने Android 12 च्या लाँच आधी आपल्या Android OS साठी मोठ्या अपडेटची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फीचर्स असणार आहेत.

Google ने Android 12 च्या लाँच आधी आपल्या Android OS साठी मोठ्या अपडेटची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फीचर्स असणार आहेत.

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : Google आपलं Android 12 मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम लवकरच अधिकृतपणे लाँच करणार आहे. Google ने Android 12 च्या लाँच आधी आपल्या Android OS साठी मोठ्या अपडेटची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फीचर्स असणार आहेत.

Camera Switch -

गुगलने अँड्रॉईड एक्सेसिबिलीटी सूटमध्ये एका नव्या कॅमेरा स्विच फीचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युजरला आपल्या कॅमेऱ्याला स्विचमध्ये बदलण्याची परवानगी देतं, ज्यामुळे फेस जेस्चरचा वापर करुन आपल्या स्मार्टफोनला कंट्रोल करू शकतात. कंपनीच्या प्रोजेक्ट अॅक्टिवेट अॅपचा वापर करुन हे केलं जातं.

Android TV feature -

Android Phone मध्ये येणारं दुसरं फीचर युजर्सला आपल्या अँड्रॉईड फोनचा वापर करुन आपल्या टीव्हीला कंट्रोल करण्यास सक्षम बनवतील. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अँड्रॉईड फोनमध्ये रिमोट-कंट्रोल फंक्शन्स सामिल केले आहेत, याद्वारे युजर्स टीव्ही ऑन करू शकतात. तसंच फोनवरुनच आपल्या आवडीचा शो सुरू करू शकतात. हे फीचर पुढील काही आठवड्यांमध्ये 14 देशांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Android Auto -

अँड्रॉईड ऑटो युजर्सला गुगल असिस्टेंसने पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन्ससह गाणी, न्यूज, पॉडकास्ट ऐकण्यास मदत करेल. त्याशिवाय अँड्रॉईड ऑटोच्या मदतीने महत्त्वाच्या मीटिंग आणि मेसेज टॉपवर ठेवण्यासही मदत करेल.

Photo-Video Passcode -

Google अँड्रॉईड युजर्ससाठी गुगल फोटो फीचरमध्ये लॉक फोल्डर फीचर रोलआउट करणार आहे. यायद्वारे युजर्स फोट-व्हिडीओ एका पासकोड प्रोटेक्टेड फोल्डरमध्ये टाकू शकतात. इतर फोटोवेळी हे प्रोटेक्टेड फोटो सर्चमध्ये दिसणार नाहीत.

First published:

Tags: Android, Google