मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google तुमची कोणती माहिती save करतोय? अशी मिळवा माहिती

Google तुमची कोणती माहिती save करतोय? अशी मिळवा माहिती

तुम्ही केलेल्या सर्चवर गुगलची नजर असते हे माहितेय का? गुगल तुमच्या सर्चवर नजर ठेवतो आणि संपूर्ण माहिती आपल्या सर्व्हरवर स्टोर करतो.

तुम्ही केलेल्या सर्चवर गुगलची नजर असते हे माहितेय का? गुगल तुमच्या सर्चवर नजर ठेवतो आणि संपूर्ण माहिती आपल्या सर्व्हरवर स्टोर करतो.

तुम्ही केलेल्या सर्चवर गुगलची नजर असते हे माहितेय का? गुगल तुमच्या सर्चवर नजर ठेवतो आणि संपूर्ण माहिती आपल्या सर्व्हरवर स्टोर करतो.

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्ससाठी (Smartphone Users) गुगल (Google) महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती घेण्यासाठी, अडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी सर्रास गुगल सर्च (Google Search) केलं जातं. पण तुम्ही केलेल्या सर्चवर गुगलची नजर असते हे माहितेय का? गुगल तुमच्या सर्चवर नजर ठेवतो आणि संपूर्ण माहिती आपल्या सर्व्हरवर स्टोर करतो. गुगल कोणत्याही युजरच्या कोणत्याही डेटाचा गैरवापर करत नसल्याचं सांगतो, परंतु तुमची पर्सनल अॅक्टिव्हिटी दुसऱ्यावर अवलंबून असते, तेव्हा चुकीच्या हातात जाण्याची आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात तुम्ही गुगलकडे तुमची किती माहिती स्टोर आहे हे तपासू शकता.

हे वाचा - वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत

अशी तपासा Google Activity -

प्रत्येक जीमेल युजर (Gmail User) आपल्या गुगल डेटाची (Google Data) माहिती मिळवू शकत असल्याचा दावा गुगलने केला आहे. सर्वात आधी गुगल अकाउंट (Google Account) सेक्शनमध्ये जावं लागेल. डेस्कटॉपवर उजव्या बाजूला असलेल्या फोटोवर क्लिक करा.

- फोटोवर क्लिक केल्यानंतर Manage Your Account ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्यात Data and Privacy वर क्लिक करा.

- इथे तुमची संपूर्ण अॅक्टिव्हिटी दिसेल. इथे तुम्ही कधी काय केलं याची माहिती मिळेल. इथे Gmail सह गुगल मॅपची टाइमलाइन (Google Map Timeline) , यूट्यूब वॉच (YouTube Watch) आणि सर्च हिस्ट्रीही (Search History) दिसेल.

- त्याशिवाय My Google Activity मध्येही गुगलवर कधी-काय सर्च केलं याची माहिती मिळेल. हे बंद करण्याचाही पर्याय असतो. काही सेटिंग्सद्वारे तुम्ही हे बंद करू शकता. पण ही सेटिंग तुम्ही बंद केली तरी गुगल तुमची माहिती स्टोर करणार नाही असं होत नाही. ही सेटिंग बंद केल्याने केवळ तुम्हाला ही माहिती दिसणार नाही, पण गुगल तुम्हाला ट्रॅक करेल.

हे वाचा - Facebook च्या साम्राज्याला धोका! 17 वर्षांत प्रथमच युझर्सच्या संख्येत मोठी घट

Google इतर कोणत्या Apps आणि सर्विसद्वारे तुमचा डेटा घेतो, हेदेखील तुम्ही इथे पाहू शकता. कोणत्या Apps ला गुगलचा अॅक्सेस दिला आहे हेदेखील पाहता येईल.

First published:

Tags: Facebook, Gmail, Google, Smartphone, Tech news, Youtube, YouTube Channel