Home /News /technology /

Facebook च्या साम्राज्याला धोका! 17 वर्षांत प्रथमच युझर्सच्या संख्येत मोठी घट; Meta चा शेअरही गडगडला

Facebook च्या साम्राज्याला धोका! 17 वर्षांत प्रथमच युझर्सच्या संख्येत मोठी घट; Meta चा शेअरही गडगडला

फेसबुकच्या दैनंदिन युझर्सची (Daily Users of Facebook are decreasing) संख्या कमी होत असून, 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच फेसबुकचं साम्राज्य धोक्यात आलं आहे.

मुंबई, 03 नोव्हेंबर: जगातला सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असणाऱ्या फेसबुकला (Facebook) अलीकडच्या काळात अनेक वादग्रस्त मुद्द्यांवरून तीव्र टीकेचा सामना करावा लागला आहे. एका अहवालानुसार, फेसबुकच्या दैनंदिन युझर्सची (Daily Users of Facebook are decreasing) संख्या कमी होत असून, 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच फेसबुकचं साम्राज्य धोक्यात आलं आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस फेसबुकच्या मूळ कंपनीचं नाव बदलून मेटाव्हर्स (Metaverse) असं करण्यात आलं. त्यानंतर मेटा कंपनीनं नुकताच आपला पहिला तिमाही आर्थिक निकाल जाहीर केला आहे. 2 फेब्रुवारीला याविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत मेटाचे (Meta Platform INC) मुख्य वित्तीय अधिकारी डेव्ह वेहनर (Dave Wehner) यांनी येत्या तिमाहीत कंपनीचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो, असं स्पष्ट केलं. 2021च्या चौथ्या तिमाहीत फेसबुकचे जवळपास पाच लाख जागतिक युझर्स (Global Users) कमी झाले आहेत,असं कंपनीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या सगळ्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर तत्काळ दिसून आला. बुधवारी मेटाचा शेअर (Meta Share Price) 22.9 टक्क्यांनी घसरून 249.05 डॉलर्सवर आला. त्यामुळे कंपनीचं भांडवली बाजारमूल्य 200 अब्ज डॉलर्सनी कमी झालं. हे वाचा-WhatsAppकडून 20लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन,तुम्हीही अशी चूक करू नका सध्या कंपनीला टिकटॉक (Tiktok) आणि यू-ट्यूबकडून (YouTube) होणाऱ्या मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. मोठ्या संख्येने युझर्स या प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. याचा परिणाम फेसबुकच्या आगामी तिमाहीतल्या महसुलावर होऊ शकतो, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कंपनीच्या कमाईत जाहिरातींचा (Advertisement) मोठा वाटा असतो. त्या कमाईवर अधिक परिणाम होण्याची शक्यता कंपनीनं व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुकचे दर महिन्याला 2.91अब्ज युझर्स होते. त्या आधीच्या तिमाहीच्या तुलनेत या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे युझर्सची संख्या कमी झाल्याने नफ्यावर परिणाम झाल्याचं, तसंच कंपनीला मिळणाऱ्या जाहिरातींवरही याचा थेट परिणाम होणार असल्याचं मेटाने स्पष्ट केलं आहे. यामुळे पहिल्या तिमाहीत त्यांची कमाई 27-29 अब्ज डॉलर्स असू शकते, तर तज्ज्ञांनी तो आकडा 30.15 अब्ज डॉलर्स राहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत कंपनीची कमाई 33.67 अब्ज डॉलर्स होती, तर वर्षभरापूर्वी ती 28.07 अब्ज डॉलर्स होती, असं कंपनीनं म्हटलं आहे. हे वाचा-स्मार्टफोनला कव्हर वापरण्याचे 'हे' आहेत तोटे, घ्या जाणून अ‍ॅपलनं (Apple) आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमची गोपनीयता बदलली आहे, ज्यामुळे ब्रँड्सना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) जाहिरात करणं कठीण होत आहे. कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या अ‍ॅप्समध्येदेखील युझर्सची संख्या वाढण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याचंही कंपनीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
First published:

Tags: Facebook

पुढील बातम्या