Home /News /sport /

T20 World Cup: जुनं वैभव मिळवण्यासाठी Sri Lanka ला करावी लागणार प्रयत्नांची शर्थ

T20 World Cup: जुनं वैभव मिळवण्यासाठी Sri Lanka ला करावी लागणार प्रयत्नांची शर्थ

sri lanka

sri lanka

श्रीलंकेनं 2014 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. माजी विजेत्यंवर यंदा पात्रता फेरीत खेळण्याची नामुश्की ओढावली होती. पात्रता फेरीतील सर्व सामने एकतर्फी जिंकणाऱ्या श्रीलंकेला मुख्य फेरीत प्रयत्नांची शर्थ करावी लागेल.

    दुबई, 23 ऑक्टोबर : आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप (ICC T20 World Cup ) स्पर्धा सध्या यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) सुरू आहे. या वर्ल्ड कपमध्ये विजतेपदासाठी सर्वच टीम्स आपलं सर्वस्व पणाला लावत आहेत.  2014 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकलेली श्रीलंकेची टीम यंदा दसून शनाकाच्या (Dasun Shanaka) नेतृत्वाखाली खेळत असून, धनंजया डिसिल्व्हा (Dhananjaya De-Silva) व्हाईस कॅप्टन आहे. सात वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी श्रीलंकेला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. माजी विजेत्या श्रीलंकेवर यावेळी पात्रता फेरीत खेळण्याची नामुष्की ओढावली होती. त्यांनी पात्रता फेरीतील सर्व मॅच एकतर्फी जिंकत मुख्य फेरीत (Super 12 Round) प्रवेश केला आहे. श्रीलंकेनं या वर्ल्ड कपमधील टीम निवडीनंतर चार बदल केले आहेत.  कामिंदू मेंडिस, नुवान प्रदीप आणि प्रवीण जयविक्रमा यांना अंतिम टीममध्ये स्थान मिळालं नाही. ऑफस्पिनर अकिला धनंजया (Akila Dhananjaya) हा काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या टी-20 इंटरनॅशनल टीमचा महत्त्वाचा भाग होता.  मात्र 2021मधल्या 9 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये तो 48.16च्या सरासरीने केवळ सहाच विकेट्स घेऊ शकला आहे. त्याच्या आजवरच्या करिअरमधील ही नीचांकी कामगिरी आहे. तरीही श्रीलंकेनं या अनुभवी स्पिनरवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. टीममधल्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वानिंदू हसरंगाकडे (Wanindu Hasranga) आहे.  तर श्रीलंकेच्या बॅटिंगची धुरा कुसल परेराकडे (Kusal Perera) असेल. दुखापतीमधून बऱ्या झालेल्या परेराकडून श्रीलंकेला सर्वोच्च कागिरीची अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमधून टी-20 आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण करणाऱ्या 21 वर्षीय महिश थिक्षणाचाही टीममध्ये समावेश आहे. लाहिरू कुमारासह दुष्मंथा चामीरा, बिनुरा फर्नांडो आणि चामिका करुणारत्ने हे चार खेळाडू फास्ट बॉलिंगची जबाबदारी सांभाळतील. श्रीलंका टीम (Sri Lanka Squad) दासून शनाका (कॅप्टन), कुशल परेरा, दिनेश चंडीमल, धनंजया डिसिल्वा, पूथम निशंका, चरीथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानूका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वनिन्दू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लाहिरु कुमारा, महीश थीक्षणा, अकिला धनंजय, बिनूरा फर्नांडो श्रीलंका संघाचे वेळापत्रक (Sri Lanka Time Table) 23 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुपारी, 3.30 वाजता 28 ऑक्टोबर-  श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सायंकाळी 7.30 वाजता 30 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध साऊथ अफ्रिका दुपारी, 3.30 वाजता 1 नोव्हेंबर - श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सायंकाळी 7.30 वाजता 4 नोव्हेंबर - श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सायंकाळी 7.30 वाजता ग्रुप-1 मधल्या टीम वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका बांगलादेश ग्रुप-2 मधल्या टीम भारत पाकिस्तान न्यूझीलंड अफगाणिस्तान स्कॉटलंड नामिबिया
    First published:

    Tags: Sri lanka, Sri lanka t-20 champions, T20 world cup

    पुढील बातम्या