Home /News /national /

संभाजीराजे ठरवणार पुढची दिशा? बिल्डर अविनाश भोसले यांना CBI ची अटक, मुंबईत पुन्हा कोरोना स्फोट? TOP बातम्या

संभाजीराजे ठरवणार पुढची दिशा? बिल्डर अविनाश भोसले यांना CBI ची अटक, मुंबईत पुन्हा कोरोना स्फोट? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 27 मे :  राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सध्या रस्सीखेच सरू आहे. शिवसेने आता त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद निमंत्रित केलेली आहे. पुण्यातून (Pune News) मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. मुंबईकरांनो आता सावध राहा. कारण कोरोनाव्हायरस पुन्हा मुंबईला आपल्या विळख्यात घेतो आहे (Coronavirus cases increasing in Mumbai). मुंबईत पुन्हा दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. संभाजीराजे छत्रपती भूमिका स्पष्ट करणार राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद निमंत्रित केलेली आहे. अविनाश भोसले यांना CBI कडून अटक पुण्यातून (Pune News) मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. याशिवाय अविनाश भोसले हे शरद पवार यांच्या जवळच्या लोकांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तामुळे पवारांना मोठा झटका बसू शकतो. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपच्या नरेंद्र मेहतांना कोर्टाकडून काहिसा दिलासा भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मेहता यांना 30 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे (Corruption) गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ACB ने केलेल्या तपासात अपसंपदा झाल्याची माहिती उघड झाली होती. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे. या दरम्यान नरेंद्र मेहता यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित सात मालमत्तांवर धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी अनिल परबांची अनेक तास चौकशी केली. ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्टवरुनच संबंधित कारवाई केली गेल्याची माहिती दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईवर पुन्हा 'कोरोनास्फोट'? मुंबईकरांनो आता सावध राहा. कारण कोरोनाव्हायरस पुन्हा मुंबईला आपल्या विळख्यात घेतो आहे (Coronavirus cases increasing in Mumbai). मुंबईत पुन्हा दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. (Coronavirus in Mumbai). आज तर सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तीन महिन्यांनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांचा पुन्हा हादरवणारा आकडा समोर आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन नाराजी व्यक्त केली आहे. "शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कोणत्याही कारवाईला घाबरलेली नाही आणि कधीच घाबरणारही नाही. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारच्या कारवाई केल्या जात आहेत. राजकीय फायद्यााठी केल्या जाणाऱ्या या कारवाई म्हणजे लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार आहे", अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडी देखील घडत आहेत. पण या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्न नेमकं कोण करेल? हा मुद्दा आता जास्त महत्त्वाचा आणि गडद होताना दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना केंद्रात विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करायचं आहे. ती भावना त्यांनी मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परषदेत बोलून दाखवली होती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Avinash Bhosale, Pune, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या