जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / सव्वा 8 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपच्या नरेंद्र मेहतांना कोर्टाकडून काहिसा दिलासा

सव्वा 8 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपच्या नरेंद्र मेहतांना कोर्टाकडून काहिसा दिलासा

सव्वा 8 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपच्या नरेंद्र मेहतांना कोर्टाकडून काहिसा दिलासा

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मे : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मेहता यांना 30 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे (Corruption) गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ACB ने केलेल्या तपासात अपसंपदा झाल्याची माहिती उघड झाली होती. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे. या दरम्यान नरेंद्र मेहता यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मेहतांवर सव्वा 8 कोटींच्या अपसंपदाचा आरोप नरेंद्र मेहता हे मीरा-भाईंदरचे माजी भाजप आमदार आहेत. त्यांच्यावर 8 कोटी 25 लाख 51 हजार 773 रुपयांची अपसंपदा असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक ) नरेंद्र मेहता यांनी 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2015 दरम्यान पदाचा दुरुपयोग करून अपसंपदा जमा केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांच्यावरही भ्रष्टाचाराच्या आरोपांचे ताशेरे ओढण्यात आले होते. सुमन यांनी रकमेची हेराफेरी करण्यात सहाय्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. अँटिकरप्शन ब्युरोकडे दाखल तक्रारीच्या चौकशी तपासात ही अपसंपदा उघड झाली होती. याच प्रकरणी आता हायकोर्टात खटला सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 मे रोजी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात