Home /News /maharashtra /

सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

Big News : पुण्याचे बडे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत.

    पुणे, 26 मे : पुण्यातून (Pune News) मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. याशिवाय अविनाश भोसले हे शरद पवार यांच्या जवळच्या लोकांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तामुळे पवारांना मोठा झटका बसू शकतो. आज सकाळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला आधीच जबर धक्का बसला आहे. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे. कोण आहेत अविनाश भोसले? महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेश शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रिक्षा चालक म्हणून केली होती. त्यावेळी ते पुण्यातील रस्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहत होते. अविनाश भोसले यांनी हळूहळू बांधकाम उद्योगाशी संबंधित लोकांशी ओळख वाढवली. यानंतर ते रस्ते तयार करण्याचं छोटं-मोठं काम घेऊ लागले. यानंतर ते पूर्णपणे बांधकाम व्यवसायात शिरले आणि आज कोट्यवधी रुपयांच्या  ABIL ग्रुपचे मालक आहेत. अविनाश भोसले यांचं महाविकास आघाडी सरकारशी कनेक्शन... अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचं मानलं जातं. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचं मोठं नाव आहे. देशभरात यांची कंपनी बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध आहे.
    First published:

    Tags: Pune, Pune news

    पुढील बातम्या