दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध (restriction in Mumbai) लावण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली आहे. हे वाचा - मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत कोविड रुग्णसंख्या वाढते आहे याबाबत आढावा घेऊन चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, आज कॅबिनेटमध्ये जे मुद्दे होते त्या सर्वांवर चर्चा झाली. कोविडचे रुग्ण वाढले त्यावर चर्चा झाली. संख्या वाढली तर येत्या काळात निर्बध येण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंधांची वेळ येईल. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे. पुन्हा मास्क सक्ती होणार? गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. मास्क मुक्ती झाल्याने नागरिकांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात केंद्राचं पाच राज्यांना पत्र भारतातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला होता. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं होतं. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.#CoronavirusUpdates 26th May, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/AqqsBBfadh
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai