Home /News /mumbai /

'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले

'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले

शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कोणत्याही कारवाईला घाबरलेली नाही आणि कधीच घाबरणारही नाही, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे रोखठोकपणे म्हणाले आहेत.

    मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन नाराजी व्यक्त केली आहे. "शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कोणत्याही कारवाईला घाबरलेली नाही आणि कधीच घाबरणारही नाही. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारच्या कारवाई केल्या जात आहेत. राजकीय फायद्यााठी केल्या जाणाऱ्या या कारवाई म्हणजे लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार आहे", अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? "मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारच्या कारवाई करणं उचित नाही. केंद्रीय तपास यंत्रणा या राजकीय सुडापोटी किंवा राजकीय फायद्यासाठी जेव्हा-जेव्हा वापल्या जातील तेव्हा हा लोकशाहीचा एकप्रकारे गळा घोटण्याचा प्रकार आहे. शिनसेना कधीही झालेल्या कारवाईला घाबरलेली नाही आणि घाबरणार नाही. न्यायालयीन लढा लढून त्याला उत्तर दिलं जाईल", अशी रोखठोक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. (भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? देशातल्या राजकीय घडामोडींना वेग) "महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून प्रत्येकवेळेला अशाप्रकारचं दबावतंत्र वापरुन सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान केलं गेलं. पण या कारस्थानातून त्यांना यश मिळणार नाही. झालेली कारवाई दुर्देवी आहे. मी त्याचा निषेध करतो. अशाप्रकारच्या कारवाई करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकता येणार नाही", अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी खडसावलं आहे. त्यांचा बोलण्याचा रोख हा भाजपकडे होता. सलग बारा तासांच्या झाडाझडतीनंतर ईडी अधिकारी परबांच्या घराबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विश्वासू सहकारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरावर ईडीने आज पहाटे धाड टाकली. ईडीने अनिल परबांशी संबंधित तब्बल सात मालमत्तांवर धाड टाकली. या धाडीच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडी अधिकारी सलग बारा तासांची झाडाडती घेतल्यानंतर अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानावरुन निघाले आहेत. ईडी अधिकारी अनिल परब यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या