Home /News /national /

संभाजीराजेंना भाजपकडून अडथळा? केतकी चितळेला कोर्टात हजर करणार, मुंबईत मान्सून लवकरच येणार TOP बातम्या

संभाजीराजेंना भाजपकडून अडथळा? केतकी चितळेला कोर्टात हजर करणार, मुंबईत मान्सून लवकरच येणार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 18 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. पण आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही (bjp) संभाजीराजे यांची वाट आणखी बिकट केली आहे. राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे. वादग्रस्त पोस्टप्रकरणी पोलीस कोठडी असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे कोर्टात हजर केले जाईल. राणा दाम्पत्याने जामीन अटींचा भंग केला केल्याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबईत यंदा मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवणार? राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. पण आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही (bjp) संभाजीराजे यांची वाट आणखी बिकट केली आहे. राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा होत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला मेधा सोमय्या (सोबत किरीट सोमय्या असणार) शिवडी येथील न्यायालयात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार. केतकी चितळेला न्यायालयात हजर करणार वादग्रस्त पोस्टप्रकरणी पोलीस कोठडी असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे हिची पोलिस कोठडी संपत असल्याने ठाणे कोर्टात हजर केले जाणार आहे. राणा दाम्पत्याविरोधात सुनावणी राणा दाम्पत्याने जामिन अटींचा भंग केला केल्याप्रकरणी सरकारी वकीलांनी तक्रारार दाखल केली आहे. त्यावर सुनावणी आहे. राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले सडेतोड आणि परखड भाष्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, आज याचीच झलक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना (media reporter) पाहण्यास मिळाली. जगू द्याल की नाही? असा सवाल करत राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले. राज ठाकरे अचानक भडकल्यामुळे पत्रकारांमध्येही गोंधळ उडाला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शरद पवार आणि शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजेंचं सर्व आमदारांना पत्र, म्हणाले.. राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पण, शिवसेनेनं दोन जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ केली. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर (Diesel rate) 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. डिझेलच्या दर वाढीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. (Diesel rate and farmer) शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ('Tractor Our Diesel Yours' scheme for farmers) या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. (farmers scheme) सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपली सय्यद या मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे. आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी  राज ठाकरे यांच्यावर पुण्यातील सभेवरून निशाणा साधला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मंत्र्यांच्या बंगल्यात बत्ती गूल, तासाभरापासून अंधाराच अंधार! उन्हाळ्याचा पार वाढत असताना राज्यावर लोडशेडिंगचे (loadshedding) संकट उभे ठाकले आहे. आता राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला (mumbai mantralaya) लोडशेडिंगचा फटका बसला आहे. एवढंच नाहीतर अनेक मंत्र्यांच्या (ministers bungalows) बंगल्यातील बत्ती गूल झाली आहे. एक तासांपासून वीज खंडीत झाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईत यंदा मान्सून लवकरच येणार मुक्कामी; ही असेल तारीख राज्यात मागच्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट (heat wave) वाहत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेता (yellow alert) देण्यात आला होता. दरम्यान आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची (rain) शक्यता वर्तवण्यात आली होती. काल सोमवारपासून अंदमानमध्ये मान्सून (monsoon came in Andaman) आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान केरळ मार्गे महाराष्ट्रात मान्सूनचा (Maharashtra monsoon) प्रवास राहणार आहे. (weather forecast). सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. Assam floods : पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार आसाममध्ये (Assam) मुसळधार पाऊस (Heavy rain) आणि पुराने (flood in Assam) कहर केला आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांतील 2 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील लष्कर, हवाई दल, पोलीस आणि स्वयंसेवी संस्था लोकांना वाचवण्यात आणि बाहेर काढण्यात गुंतलेल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sambhajiraje chhatrapati, Shivsena

    पुढील बातम्या