Home /News /agriculture /

Farmers scheme : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'नंतर ठाकरे सरकारची  शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना जाणून घ्या फायदे

Farmers scheme : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'नंतर ठाकरे सरकारची  शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना जाणून घ्या फायदे

Maharashtra Farmers Scheme: शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे.

  अकोला, 17 मे : केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ केली. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर (Diesel rate) 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. डिझेलच्या दर वाढीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. (Diesel rate and farmer) शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ('Tractor Our Diesel Yours' scheme for farmers) या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. (farmers scheme) विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान सहाय्य व्हावे, व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे या महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे. ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. हे ही वाचा : Monsoon in Mumbai: Good News! मुंबईत यंदा मान्सून लवकरच येणार मुक्कामी; ही असेल तारीख जिल्ह्यातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना ‘पेरणी ते कापणी’ दरम्यान सहाय्य मिळून उत्पादन खर्च कमी करता यावा यासाठी 'ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा सोमवारी(दि.16) वरुळ-जऊळका ता.अकोट येथील सिमा काठोळे यांच्या शेतात शुभारंभ केला. त्यावेळी मंत्री कडू यावेळी त्यांनी माहिती दिली. बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह वेळ महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे असतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. हे ही वाचा : BMC Election 2022: यंदाचा पावसाळा शिवसेनेला वाचवणार अन् भाजपला बुडवणार?
  अकोला जिल्ह्यातील सर्व निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आर्थिक स्वालंबन होण्यास मदत होईल. हा उपक्रम यशस्वी झाल्यास राज्यभर राबविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे, कडू यांनी सांगितले. त्या अनुषंगाने विधवा शेतकरी महिलाकरीता ‘पेरणी ते कापणी’ दरम्यान शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली.
  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Petrol and diesel price, शेतकरी

  पुढील बातम्या