Home /News /mumbai /

संभाजीराजेंची वाट आता भाजपनेच अडवली, राज्यसभेची तिसरी जागा लढवणार?

संभाजीराजेंची वाट आता भाजपनेच अडवली, राज्यसभेची तिसरी जागा लढवणार?

भाजपकडून पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी आहे.

    मुंबई, 17 मे :  राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. पण आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही (bjp) संभाजीराजे यांची वाट आणखी बिकट केली आहे. राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा होत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. भाजपने आता संख्याबळ नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून  पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त १३ मतांची गरज आहे. (ड्रायव्हिंग लायसन्सचं वयंही नव्हतं, एकाच बाईकवर चौघांचा प्रवास, अपघात झाला अन्) तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत.  संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. पण, शिवसेनेनं दुसरा उमेदवार उतरवण्याचा घाट केला आहे. तर आता भाजपने तिसरी जागा लढवण्याची खेळी केली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसही पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती पण शिवसेनेनं दोन जागेवर उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे.  सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे मदतीचे आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे. संभाजीराजे यांचं पत्र! आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे. (तुम्हाला माहीत आहे का? मांजरीही एकमेकांना आणि माणसांना नावानं ओळखू शकतात) २००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या  हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.  छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे.  माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो."
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या