मुंबई, 17 मे : राज्यात मागच्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट (heat wave) वाहत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेता (yellow alert) देण्यात आला होता. दरम्यान आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची (rain) शक्यता वर्तवण्यात आली होेती. काल सोमवारपासून अंदमानमध्ये मान्सून (monsoon came in Andaman) आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान केरळ मार्गे महाराष्ट्रात मान्सूनचा (Maharashtra monsoon) प्रवास राहणार आहे. (weather forecast)
राज्यात कोकणात पहिल्यांदा मान्सूनचे आगमन होणार आहे. यानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. बळीराजासोबत शहरीभागातीलही मान्सूनची चाहूल लागली आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि मुख्य शहरात मान्सून 6 जूनच्या दरम्यान येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : Weather update: राज्यात तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज 13 जिल्ह्यांना yellow alert
27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या वेळपत्रकात बदल न झाल्यास पुढच्या तीन आठवड्यात म्हणजे 6 जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत तर11 जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पोहोचण्याी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून विदर्भ आणि मराठवाड्यात महिनाभर आदी पोहोचण्याचा अंदाज आहे.
दरम्यान महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून असानी चक्रीवादळामुळे (asani cyclone) ढगाळ वातावरण होते तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची (heat wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता (maharashtra weather update) असल्याचे सांगितले आहे. मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. 17 मे पासून मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे वर्तवण्यात आले होते.
मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा 10 दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Latest satellite obs at 4.15 pm, 17 May.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 17, 2022
Dense clods are observed over parts of Kerala, Karnataka, Goa as a result of CYCIR over SE Arabian Sea and Lakshdweep areas.
watch for IMD Updates pic.twitter.com/ECxqhIhdK7
पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार तळकोकणात २ जूनपर्यंत मान्सूनचे (Monsoon) आगमन होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तसे संकेतही मिळण्यास सुरुवात झाली आहे. मच्छीमारांच्या माहितीनुसार समुद्रात फेसाच्या मोठ्या लाटा येत असल्याने पुढच्या दोन आठवड्यात मान्सून कोकणात सुरू होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेने नागरीक हैराण झाले आहेत. पुढच्या दोन दिवसांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

)







