Home /News /mumbai /

BREAKING : मंत्र्यांच्या बंगल्यात बत्ती गूल, तासाभरापासून अंधाराच अंधार!

BREAKING : मंत्र्यांच्या बंगल्यात बत्ती गूल, तासाभरापासून अंधाराच अंधार!

मंत्रालयासमोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात आज संध्याकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला

मंत्रालयासमोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात आज संध्याकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला

मंत्रालयासमोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात आज संध्याकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला

मुंबई, 17 मे : उन्हाळ्याचा पार वाढत असताना राज्यावर लोडशेडिंगचे (loadshedding) संकट उभे ठाकले आहे. आता राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला (mumbai mantralaya) लोडशेडिंगचा फटका बसला आहे. एवढंच नाहीतर अनेक मंत्र्यांच्या (ministers bungalows) बंगल्यातील बत्ती गूल झाली आहे. एक तासांपासून वीज खंडीत झाली आहे. मुंबईत मंत्रालयासमोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात आज संध्याकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. तब्बल 1 तासांपासून वीज पुरवठा बंद आहे. आज सकाळी सुद्धा वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा मंत्र्यांच्या बंगल्यातील लाईट केली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात वीज गेली आहे.
(सायकल चालवताना लागला आईला धक्का, अभिनेत्रीने 9 वर्षाच्या मुलावर केला गुन्हा दाखल) मंत्र्यांच्या बंगल्यातील व्यवस्थापकांना विचारले असता, आज सकाळी वीज पुरवठा खंडीत झाला होता. नेमकं वीज पुरवठा का ठप्प झाला याचे कारण अजून कळू शकले नाही, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आले आहे, अशी माहिती दिली आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला, अन् परतलाच नाही; सतीश चौधरीचा भयावह अंत) दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज पुरवठा करणारी सप्लाय लाईन ट्रिप झाल्याची माहिती समोर आली आहे. वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने काम हाती घेऊन वीज पुरवठा पुन्हा एकदा पुर्ववत केला आहे. नेमकं काय झालं?   आज अचानक मुंबईत काही मंत्र्यांना अघोषित लोडशेडिंगचा फटका बसला. मंत्रालयासमोरील काही मंत्र्यांच्या बंगल्याची चक्क बत्ती गुल झाली.विशेष म्हणजे,नेमकं काय झालंय ? हे जाणून घेण्यासाठी ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांच्या बंगल्यावरून सातत्यानं संपर्क केला जात होता. मात्र अत्यंत टाळाटाळ करणारी उत्तरं मिळत असल्याचं व्यथित उत्तर चक्क मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. दोषींची चौकशी करून कारवाई करणार असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या