पुणे, 17 मे : सडेतोड आणि परखड भाष्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, आज याचीच झलक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना (media reporter) पाहण्यास मिळाली. जगू द्याल की नाही? असा सवाल करत राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले. राज ठाकरे अचानक भडकल्यामुळे पत्रकारांमध्येही गोंधळ उडाला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पुण्यात 21 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. याआधी राज ठाकरे पुण्यात पोहोचले आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेले दुकान अक्षरधारा इथं राज ठाकरे पोहोचले होते. यावेळी ते काही पुस्तकं खरेदी करत होते.
(शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 2 कोटी सोन्याचं दान, चौथराही आता सोन्याचा!)
राज ठाकरे हे अक्षरधारामध्ये पोहोचण्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी तिथे पोहोचले. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकार करत होते. त्यामुळे अचानक राज ठाकरे भडकले आणि जगू द्याल की नाही? असा सवालच राज ठाकरेंनी पत्रकारांना केला. त्यामुळे पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर राज ठाकरे हे पुस्तक खरेदी करून माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलता निघून गेले.
राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा
दरम्यान, राज ठाकरे येत्या 21 मे रोजी पुण्यात जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Pune) घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या झालेल्या सभा आणि त्यासभेत त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका यामुळे वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता 21 मे रोजी पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांची प्रतिक्रिया आली आहे.
('खरंच राजकुमारी वाटतेयस..' Sara Tendulkarच्या लुकवर क्रिकेटरच्या पत्नीची कमेंट)
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचं काहीही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरेंनी सभा घेण्यासाठी काहीही हरकत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.