मराठी बातम्या /बातम्या /देश /पराभवानंतर सेनेचं आत्मचिंतन? राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काळजी घ्या, मंकीपॉक्स हवेतून पसरतोय TOP बातम्या

पराभवानंतर सेनेचं आत्मचिंतन? राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काळजी घ्या, मंकीपॉक्स हवेतून पसरतोय TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 12 जून : शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. मंकीपॉक्स विषाणू हवेतूनही पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा.

यशवंत किल्लेदारांचा शिवसेनेवर निशाणा

शिवेसेनेकडून राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाला, असा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या दाव्यावर मनसेचे (MNS) नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी टीका केली आहे. दुसऱ्याने केला तो घोडेबाजार आणि तुम्ही केलात तो काय भेंडीबाजार? असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

'वर्षा'वर सलग दोन तास खलबतं

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा झटका बसला आहे. शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

'काँग्रेसने भाजपचं एक मत फोडलं', यशोमती ठाकूर यांचा दावा

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. "काँग्रेसच्या उमेदवाराला 44 मतं मिळाली. त्यातील 2 अतिरिक्त मतांपैकी एक मत हे भाजपचं आहे", असा दावा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

रुक्मिणी मातेच्या चरणावर होणार वज्रलेप

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय. पुरातत्त्व विभागाच्या श्रीकांत मिश्रा यांची टिम आज रात्री रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करणार आहेत. आज रात्री बारानंतर पुरातत्व विभाग करणार वज्रलेप करणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील 'या' भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस

दिल्लीत उष्णतेमुळे लोकांचे हाल होत असले तरी, मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. (Mumbai Weather) मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

शेतकऱ्यांनो सावधान! आताच पेरणी करून नका

नाशिक जिल्ह्यातील काही भागात मागील चार-पाच दिवसांत मान्सून पूर्व पावसाच्या (Monsoon) सरी तुरळक ठिकाणी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात काहीसा आनंद बघायला मिळतोय, काही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी देखील केलीय. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

अकोला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

अकोला (Akola) जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर बार्शीटाकळी जवळ काल संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पण या धक्क्याची तीव्रता कमी (mild tremors) असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मंकीपॉक्सबाबत मोठी अपडेट

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाची (Coronavirus) प्रकरणे वेगाने वाढू लागली आहेत. अशातच मंकीपॉक्स संसर्गाने (Monkeypox Virus Infection) संपूर्ण जग एका नव्या संकटात सापडले आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या तज्ज्ञांनी सांगितले की मंकीपॉक्स विषाणू हवेतूनही पसरतो. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

भारतातली टॉपची फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला (Prathyusha Garimella) हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्युषा तिच्या तेलंगणा (Telangana) येथील राहत्या घरात पोलिसांना मृतावस्थेत आढळली आहे. 'एएनआय'ने याबाबत वृत्त दिलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra