Home /News /mumbai /

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट

नैऋत्य मान्सून 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पूर्वी वर्तवला होता.

    मुंबई, 11 जून : दिल्लीत उष्णतेमुळे लोकांचे हाल होत असले तरी, मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. (Mumbai Weather) मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे. हवामान खात्याने काय म्हटलं - उद्या रविवारी 11 जूनपासून राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.  नैऋत्य मान्सून 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पूर्वी वर्तवला होता. मात्र आता 15 जूनच्या दुपार किंवा सायंकाळपर्यंत पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याचं विभागाचं म्हणणं आहे. गेल्या 24 तासांत जुहू विमानतळ परिसरात 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 11 जूनच्या अधिकृत तारखेच्या दोन दिवस आधी 9 जूनला मान्सून मुंबईत दाखल झाला होता. तोपर्यंत शहरात 100 मिमी पाऊस झाला होता. शुक्रवारी दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस झाला. स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार, हा पहिला मान्सूनपूर्व पाऊस होता. यादरम्यान मुंबईतील सांताक्रूझ येथे 15 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात सायंकाळी आणि रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. मुंबई शहरातील अनेक भागात शनिवारीही पाऊस झाला. वडाळा परिसरात रस्ते जलमय झाले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD, Maharashtra News, Rain, Weather forecast

    पुढील बातम्या