नवी दिल्ली, 11 जून : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाची (Coronavirus) प्रकरणे वेगाने वाढू लागली आहेत. अशातच मंकीपॉक्स संसर्गाने (Monkeypox Virus Infection) संपूर्ण जग एका नव्या संकटात सापडले आहे. जगातील सुमारे 29 देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, मंकीपॉक्सच्या 1000 हून अधिक प्रकरणांची आतापर्यंत पुष्टी झाली आहे. दरम्यान, मंकीपॉक्स विषाणूबाबत तज्ज्ञांनी आश्चर्यकारक खुलासा केला आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या तज्ज्ञांनी सांगितले की मंकीपॉक्स विषाणू हवेतूनही पसरतो. तज्ज्ञांच्या मते, जर कोणी संक्रमित व्यक्तीच्या सतत समोरासमोर संपर्कात येत असेल तर हा विषाणू हवेतून पसरू शकतो. मंकीपॉक्स विषाणू हवेत जास्त अंतरापर्यंत जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ञांनी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. कपडे आणि बिछान्याला स्पर्श केल्याने पसरतोय डेली मेलने वृत्तानुसार, शुक्रवारी एका ब्रीफिंग दरम्यान, सीडीसी प्रमुख रोशेल व्हॅलेन्स्की यांनी सांगितले की अनेक ठिकाणी मंकीपॉक्स हा रोग लक्षणे असलेल्या रूग्णांशी शारीरिक संपर्कामुळे आणि त्यांच्या कपड्यांना आणि अंथरुणांना स्पर्श केल्यामुळे होतो, सीडीसीने प्रवासी आणि लोकांना मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे, तसेच मंकीपॉक्सने संक्रमित व्यक्तीशी संपर्क टाळण्याचा सल्ला दिला आहे. हॉलिवूड स्टार जस्टिन बीबरला झालेला आजार किती गंभीर? ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टर गाठा हा विषाणू जास्त काळ हवेत राहू शकत नाही सीडीसीने आपल्या ब्रीफिंगमध्ये असेही स्पष्ट केले की शरीरात पुरळ निर्माण करणारा मंकीपॉक्स विषाणू कोविड 19 विषाणूसारखा हवेत जास्तकाळ टिकू शकत नाही. तज्ज्ञांनी असेही सांगितले की, हा विषाणू दुसऱ्याच्या सामानाला स्पर्श केल्याने किंवा दरवाजा किंवा कुंडीला स्पर्श केल्याने पसरत नाही, जसे आपण कोरोना विषाणूच्या वेळी पाहिले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सची आतापर्यंत नोंद झालेली सर्व प्रकरणे संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आली आहेत. CDC ने लोकांना मंकीपॉक्स विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. राजधानी दिल्लीत कोरोना पुन्हा सक्रीय शनिवारी दिल्लीत कोविड-19 चे 795 नवीन रुग्ण आढळून आले असून संसर्गाचा दर 4.11 टक्के झाला. शहराच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यापूर्वी 13 मे रोजी दिल्लीत संसर्गाची 899 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती आणि चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर संसर्ग दर 3.34 टक्के होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.