अकोला, 11 जून : अकोला (Akola) जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर बार्शीटाकळी जवळ आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पण या धक्क्याची तीव्रता कमी (mild tremors) असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवतहानी झालेली नाही. संबंधित वृत्ताला जिल्हा आपत्ती व्यावस्थापन कक्षानेदेखील दुजोरा दिला आहे. अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते आणि कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजिकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे माहिती दिली आहे. त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजून 41 मि. 18 सेकंदांनी या धक्क्यांची नोंद झाली. 20.530N आणि 77.080E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिश्टर स्केलवर 3.50 इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे. ( भारतातली टॉपची फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू ) अकोल्यात गेल्यावर्षी देखील भूकंपाची बातमी समोर आली होती. अकोला शहरापासून 19 किमी लांब असलेल्या बाळापूर शहरात भूकंपाचे हादरे बसले होते. त्या भूकंपाचे तीव्रता ही 3 रिश्टर स्केल इतकी होती. त्यावेळीदेखील कोणतीही हानी झाली नव्हती. संबंधित घटना ही गेल्यावर्षी 18 एप्रिलला घडली होती. त्यावेळी खिडकी आणि घराच्या दरवाजांचा अचानक आवाज सुरु झाला झाला होता. तसेच घरामध्ये गडगड असा आवाज ऐकू आला होता. पण सुदैवाने या भूकंपाची देखील तीव्रता कमी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.