मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'काँग्रेसने भाजपचं एक मत फोडलं', यशोमती ठाकूर यांचा दावा

'काँग्रेसने भाजपचं एक मत फोडलं', यशोमती ठाकूर यांचा दावा

काँग्रेस (Congress) नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काँग्रेस (Congress) नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काँग्रेस (Congress) नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नागपूर, 11 जून : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Rajya Sabha Election Result) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) दोन्ही बाजूने वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. या दरम्यान काँग्रेस (Congress) नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. "काँग्रेसच्या उमेदवाराला 44 मतं मिळाली. त्यातील 2 अतिरिक्त मतांपैकी एक मत हे भाजपचं आहे", असा दावा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. काँग्रेसच्या कोट्यातील दोन अतिरिक्त मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिले, असंदेखील यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या समर्थकांच्या फुटलेल्या मतांवर भाजपचा तिसरा उमेदवार जिंकून आल्याचा दावा भाजपने केला आहे. पण यशोमती ठाकूर यांनी थेट भाजपचंच मत फोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. "आमच्या पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलूनच कोटा ठरवला होता. शेवटचे दोन मतं आमचे नक्कीच शिवसेनेला गेलेले आहेत. दोन मतांबद्दल सविस्तर कोणाशीही बोलणं झालेलं नाही. पण एक मत फुटलं असून ते विरोधी पक्षाचं फुटलेलं आहे आणि आम्हाला मिळालं असावं", असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. ('राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार', सुजय विखे पाटलांचा खळबळजनक दावा) "आमची मतं शिवसेनेला गेलेले आहेत. ते मतं थांबवून ठेवण्यात आलेले होते. त्यानंतरच मतदान झालं. आमच्या उमेदवाराला विरोधी पक्षाचं एक मत मिळालं आहे. आम्ही सर्वजण मिळून महाविकास आघाडीतील नाराजी दूर करु. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत नवीन रणनीती आखून आम्ही निवडणुकीला सामोरे जावे", असंदेखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं. "यशोमती ठाकूर असंही म्हणतील की, भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे त्यांचेच उमेदवार होते. किंवा महाविकास आघाडीचेच उमेदवार तिसऱ्या जागेवर जिंकले असंही ते म्हणू शकतात. हवलदाराला कानाखाली मारणं, त्यानंतर तीन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होणं, हे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. बरळणं हे महाविकास आघाडीच्या मंत्री आणि नेत्यांचा नित्याचा प्रकार झाला. त्यांनी भाजपचं मत फोडलं असं ते म्हणत असतील तर मॉडल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन महाविकास आघाडीच्या मंत्र्याने केलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करु", असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला.
First published:

पुढील बातम्या