मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BREAKING : भारतातली टॉपची फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू

BREAKING : भारतातली टॉपची फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्युषा तिच्या तेलंगणा येथील राहत्या घरात पोलिसांना मृतावस्थेत आढळली आहे.

  • Published by:  Chetan Patil
हैदराबाद, 11 जुलै : प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला (Prathyusha Garimella) हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्युषा तिच्या तेलंगणा (Telangana) येथील राहत्या घरात पोलिसांना मृतावस्थेत आढळली आहे. 'एएनआय'ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार प्रत्युषाचा तेलंगणातील बंजारा हिल्स (Banjara Hills) येथील तिच्या घरात मृतदेह सापडला आहे. पोलिसांना तिच्या बेडरुमध्ये कार्बन मोनॉक्साईड सिलेंडरही (Carbon Monoxide cylinder) सापडला आहे. तो सिलेंडर पोलिसांनी जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषा घरात असताना तिच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांनी कामानिमित्त दरवाज्याची अनेकदा बेल वाजवली. पण तिने दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बराचवेळ आवाज दिल्यानंतरही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या घराचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. पोलिसांनी घरात तपास केला असता तिथे प्रत्युषाचा मृतदेह आढळला. त्यामुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रत्युषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्रत्युषा ही तेलंगणातील बडी हस्ती आहे. ती फक्त तेलंगणाच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिच्या निधनामुळे तेलंगणात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. प्रत्युषाचा स्वत:च्याच घरात संशयितरित्या मृतदेह आढळल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. (Love Marriage च्या एका महिन्यात पत्नीची हत्या करून तरुण फरार; थरकाप उडवणारी घटना) काही प्रसारमाध्यमांनी प्रत्युषाने घरातील बाथरुममध्ये आत्महत्या केल्याचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, प्रत्युषाच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. प्रत्युषाने इतका टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न भावूक झालेल्या चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.
First published:

पुढील बातम्या