मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यसभेत एका उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, 'वर्षा'वर सलग दोन तास खलबतं

राज्यसभेत एका उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, 'वर्षा'वर सलग दोन तास खलबतं

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

    विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा झटका बसला आहे. भाजपने सहा जागांसाठीच्या या निवडणुकीत सातवा उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांची जी तयारी सुरु होती ते पाहता संजय पवार यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण या निवडणुकीत वेगळाच निकाल समोर आला. अटीतटीच्या या लढतीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित झाले. यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांचा समावेश होता. वर्षा बंगल्यावर आज संध्याकाळी सातच्या सुमारास ही बैठक सुरु झाली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर जवळपास नऊ वाजता बैठक आटोपली. बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. (महाराष्ट्रातील 'या' भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट) बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन झालं. या निवडणुकीत कुणाकडून दगाफटका झाला असावा याबाबत चर्चा झाली. राज्यसभेच्या या निवडणुकीत इतकी तयारी करुनही पराभव झाल्याने शिवसेना सतर्क झाली आहे. त्यामुळे आगामी 20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना रणनीती आखणार आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखं होणार नाही याबाबत काळजी घेण्यासाठी विशेष रणनीती आखण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान, बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यसभेत सलग चौथ्यांदा निवडून आणल्याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले असं संजय राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भेट घेतली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या