Home /News /maharashtra /

Nashik : शेतकऱ्यांनो सावधान! आताच पेरणी करून नका, हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? वाचा सविस्तर

Nashik : शेतकऱ्यांनो सावधान! आताच पेरणी करून नका, हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? वाचा सविस्तर

नाशिक : शेतकऱ्यांनो, आताच पेरणी करू नका!

नाशिक : शेतकऱ्यांनो, आताच पेरणी करू नका!

नाशिकमध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पण, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, कारण मान्सून आणखी लांबण्याची आहे. तोपर्यंत पेरणीपूर्वीची कामं आटपून घ्यावीत, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितलं आहे.

    नाशिक, 11 जून : नाशिक जिल्ह्यातील काही भागात मागील चार-पाच दिवसांत मान्सून पूर्व पावसाच्या (Monsoon) सरी तुरळक ठिकाणी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात काहीसा आनंद बघायला मिळतोय, काही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी देखील केलीय. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहिती नुसार, काल वेंगुर्ल्यात दाखल झालेला मान्सून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई ठाण्यासहित काही भाग वगळता जवळपास संपूर्ण कोकण म्हणजे 15 ते 20 टक्के महाराष्ट्र काबीज करत पुणे, डहाणूपर्यंत पोहोचला आहे. (Farmers should not sow now, wait for proper rains) मात्र, नाशिकमध्ये पोहोचण्यास अजून मान्सूनला ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोखाडा, तर उत्तर कोकणातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ भाग ओलांडायचा आहे. पुढील ३ दिवसांत म्हणजे मंगळवार दि. 14 जूनपर्यंत संपूर्ण घाटमाथा आणि धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, संपूर्ण जिल्हे तर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा उर्वरित तर मराठवाड्याचा काही भाग काबीज करण्यासाठी सध्या तरी वातावरणीय अनुकूलता जाणवत आसल्याचं दिसतंय. वाचा : पावसाळ्यात दिले जाणारे Yellow, Orange आणि Red अलर्ट काय आहे? रंगावरुन असा ओळखा धोका एकंदरीत परिस्थिती बघितली तर, जो पावसाचा जोर हवा आहे. तो दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, मान्सूनचं आगमन जरी होण्याची शक्यता असली तरी वातावरणातील बदल लक्षात घेता, मान्सून लांबण्याची देखील शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. "ज्या भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी पूर्वीची कामं, नांगरणी, वखरणी करून ठेवायला काही हरकत नाही. मात्र, पेरणी करू नये, जेव्हा पावसाचं आगमन चांगल होईल. तेव्हाच वातावरणातील बदल लक्षात घेता, हवामान शास्त्रज्ञांच्या माहिती नुसार पेरणीस सुरुवात करावी", असे आव्हान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केलेले आहे. सध्याचे हवामान अंदाजानुसार पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यानुसार पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी. शक्यतो 80 ते 100 मिली मीटर पावसाची नोंद झाल्यावरच पेरणी योग्य पाऊस झाल्याचं समजून पेरणी करावी, त्या आधी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीच संकट ओढवू शकतं. बियाणे खरेदी करताय? मग हे अवश्य लक्षात ठेवा. "पेरणीसाठी बियाणांची खरेदी करताना रितसर पक्की पावती घेणे आवश्यक असून बियाणांचा वापर करतांना पिशवी उलट्या बाजूकडून फाडून बियाणे वापरावे. त्यातील 10 ते 15 ग्रॅम बियाणे, टॅग, पिशवीसह जतन करून ठेवण्यात यावे. घरगुती बियाणांचा वापर करताना त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी", असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले आहे
    First published:

    Tags: Monsoon

    पुढील बातम्या