मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘कोरोना’चं थैमान, हे आहेत जगभरातले 50 Updates

‘कोरोना’चं थैमान, हे आहेत जगभरातले 50 Updates

 कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.

कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.

कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.

  मुंबई 13 मार्च :  ‘कोरोना’चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय. तर यामुळे शेअर बाजार कोसळल्याने आर्थिक क्षेत्रालाही हादरा बसला आहे. ब्लॅक फ्रायडे -  उद्योगांसोबतच शेअर मार्केटवरही (Share Market) मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.आज सकाळी मार्केट सुरू होण्यापूर्वीच सेन्सेक्स (Sensex) तब्बल 2450 अंकानी घसरला होता. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स तब्बल 3140 अंकानी घसरला आहे. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सच्या पडझडीचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. निर्देशांक 30 हजारांच्या खाली गेल्यानं शेअर मार्केटला सर्किट लागल्याची माहिती समोर आली आहे. निर्देशांक नियंत्रणाबाहेर गेल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग (Trading) थांबविण्यात आलं आहे.  आज सेन्सेक्स 3150 अंकांनी कोसळला असून निफ्टी 1000 अंकानी गडगडला आहे. मार्केट सध्या बंद करण्यात आलं असून 10.05 मिनिटांनी सुरू करण्यात येईल. गुगलच्या ऑफिसमध्ये कोरोना - गुगलच्या बंगळुरू ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला तसे आधी सिमटर्मस दिसले होते. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुगलने आपलं बंगळुरूमधील कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे गुगलच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. 10 एप्रिलपर्यंत हे कर्मचारी घरी राहून ऑफिसचं काम करतील. सावधान... ‘कोरोना’चा खोटा WhatsApp मेसेज Forward करणारी शिक्षिका निलंबित भारतात पहिला मृत्यू -भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) कोरोनाव्हायरसच्या रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे. शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात खळबळ माजली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती. PM मोदी - भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 73वर पोहोचली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे जनतेने घाबरुन न जाता दक्षता घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलाय... तसेच येत्या काळात कोणताही केंद्रीय मंत्री परदेश दौऱ्यावर जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नागरिकांनीही गरज नसल्यास प्रवास करु नये, असेही मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे. थिएटर्स बंद -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारनं 31 मार्चपर्यंत चित्रपगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय... दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केलीय.  दरम्यान, दिल्ली सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

  ट्रम्प यांना भेटून गेलेला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, पंतप्रधानांनी कोंडून घेतलं!

  घाबरू नका - कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. साधा ताप आणि पडसे हे कोरोना व्हायरस नाही त्यामुळे घाबरू नका, असं आवाहन इंडियन मेडिकल कौन्सिलच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केलं आहे. परत आणणार - परदेशात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप परत आणलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. इराण, युरोपसह अनेक देशात भारतीय अडकून पडलेत. या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना करण्यात येते आहेत. राज्यातली संख्या वाढली - राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 14 झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत. पुणे - पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण ९ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे.

  धक्कादायक! भारतात 'कोरोना'ने घेतला पहिला बळी; कर्नाटकातल्या वृद्धाचा मृत्यू

  तापमान - पुणे शहराचं सामान्य किमान तापमान हे 15 मार्चपर्यंत 15 अंशाच्या खालीच असणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पुढचे तिन्ही दिवस हे कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने पुणेकरांसाठी अतिशय  महत्वाचे असणार आहेत... कारण कोरोना व्हायरस हा 27 अंश सेल्सियसच्या पुढे तापमान असेल तरच जिवंत राहू शकत नसल्याचं सांगितलं जातंय...थोडक्यात पुढचे तीन दिवस कोरोना फैलावासाठी पोषक असेच म्हटले पाहिजेत.  कार्यक्रम रद्द - सार्जवजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केलंय. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुणेकरांनी आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे, तसंच, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, असं आवाहनही केलं. नागपूर - कोरोनामुळं नागरिकांनी घाबरूनर जाऊ नये असं आवाहन नागपूरचे विभागीय आयुक्तांनी केलंय. तसंच परदेशातून जाऊन आलेल्या लोकांची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरस झालाय त्याची प्रकृती स्थिर आहे. नांदेड - नांदेडमध्ये पुन्हा नव्याने करोनाचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत... हे दोन्ही रुग्ण नुकतेच परदेशाहुन आलेले आहेत... दोन्ही रुग्णांत करोनाचे प्राथमिक लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे दोन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत... दरम्यान यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलय.

  Google च्या ऑफिसमध्ये धडकला 'कोरोना'; भारतातील ऑफिस बंद

  जालना - जालन्यात आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलाय. हा संशयित रुग्ण मुंबई पोलिसांत कार्यरत आहे. त्याचा बंदोबस्तादरम्यान इस्रायली पोलिसांशी संपर्क आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहेत. कोरोना टेस्ट करिता स्लॅब प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू. खेड - रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील लोटे आणि धामनदीवी या परिसरात सहली साठी नेपाळ इथून ५० शिक्षक आले होते. यापैकी दोघाजणांना खोकला, सर्दी आणि आजारपणाची लक्षणं आढळल्याने परिसरात भीती निर्माण झालीय. त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रशासनानं तात्काळ दाखल घेत दोघांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नाशिक - रामनवमी उत्सवाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय काळाराम मंदिर विश्वस्तांनी घेतलाय... पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलंय... उत्सवा दरम्यान दैनंदिन पूजा मात्र, सुरू राहणार आहे.

  कोरोनाची भीती! शाळा-कॉलेज, थेटर यांसह राष्ट्रपती भवनसुद्धा बंद

  चंद्रपूर -  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरादारी म्हणून चंद्रपूरच्या ऐतिहासिक देवी महाकाली यात्रा स्थगित करण्यात आलीय... चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.... केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले निर्देश आणि चंद्रपुरात होणारी संभाव्य भाविकांची गर्दी लक्षात घेता यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ताडोबा - कोरोनाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही मोठा फटका बसला आहे कारण 60 टक्के परदेशी पर्यटकांनी ताडोबाचे बुकिंग जे आहे ते रद्द केलं आहे... परदेशी पर्यटकांनी ताडोबाचे बुकिंग रद्द केल्यामुळे किमान 2 हजार लोकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होणार आहे. कोल्हापूर - कोल्हापूरमधील जोतिबाच्या यात्रेवर कोरोनाचं संकट आहे.. 6 एप्रिलला यात्रा होणार असून त्याबाब काही दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. पोल्ट्री -कोरोना व्हायरसमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे कोंबडी विक्रीचा सेल सुरू असतानाच दुसरीकडे पोल्ट्री व्यावसायिक चांगलाच हवालदिल झालाय अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी आता पोल्ट्री बंद करायला सुरुवात केलीय.

  ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस

  शिर्डी - कोरोनाचा शिर्डीतही परिणाम जाणवतोय. साईदर्शनासाठी भाविकांची गर्दी रोडावली असून दर्शनरांगा ओस पडल्या आहेत. साईबाबा संस्थानकडुन खबरदारी म्हणून नॉन कॉनटँक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. संस्थानकडुन साफसफाईसोबत हँण्ड सॅनीटायझरची व्यवस्था करण्यात आलीय. पंढरपूर - पंढरपूरचा विठ्ठलाला दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. आज मात्र मंदिर ओस पडल्याचं चित्र आहे. हजारो भाविकांची गर्दी असलेली दर्शनबारी देखील रिकामी आहे. भाविकांना आता थेट गाभाऱ्यात जाता येतंय. इतरवेळी दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा अधवी लागतो. पण गर्दी रोडावल्याने आता भाविकांना केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये दर्शन मिळतंय. आढावा - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतला. यात महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पुढील काही काळ राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या अकरा झाली असून, या सर्व रुग्णांमधील लक्षणांची तीव्रता कमी आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वकिलांची मागणी -राज्यात कोरोना चे संशयीत रुग्ण आढळून आल्यानंतर उपाय योजनांसाठी युद्धपातळीवर काम केले जातय... याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याची मागणी मुंबई बार असोसिएशनने केलीय.

  'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला

  यवतमाळ - विदेशातून यवतमाळमध्ये परतलेल्या 9 नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या नागरिकांच्या पुढील उपचारासाठी थ्रोट स्वॅबचे नमुने नागपूर इथल्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. कारवाई - कोरोना पासून बचावासाठी हँड सॅनिटायझरचा वापर वाढलाय.  त्यातूनच मग बनावट सॅनिटायझरची विक्री करून उखळ पांढरं करण्याचं प्रमाण वाढलंय. मुंबईतल्या सांताक्रूझ परिसरातल्या वाकोला इथं बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यावर एफडीएनं छापा टाकला. यावेळी एक लाख 10 हजार रुपयांचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आलं. मास्क - वाढीव दराने  मास्क आणि सॅनिटाईजर विकल्याबाबत मिळालेल्या तक्रारची गंभीर दखल घेत पुण्यातील 4 मेडिकल्सना औषध खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनाने ही महत्त्वाची कारवाई केली. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 165 मेडिकल्सची तपासणी करण्यात आली, कोथरूडमधल्या 2 आणि गोखले नगर, म्हाळुंगे इथल्या प्रत्येकी एका मेडिकलवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर - धार्मिक पर्यटनासाठी परदेशात गेलेले पर्यटक गेल्या 15 दिवसांपासून अडकून पडले आहेत. यामध्ये कोल्हापूरमधील 21 जणांचा समावेश आहे... तेहरानमध्ये अडकलेल्या नागरिकांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल येताच सर्वांना मायदेशी आणलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी घटले, हे आहेत जळगाव सराफा बाजारातील नवे दर फटका - कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक वयोवृद्ध नागरिकांनी त्यांचे परदेशी दौरे रद्द केले आहेत. पण त्यामुळे त्यांचे लाखो रुपये हे ट्रॅव्हल एजन्सी कडे अडकून पडले आहेत. जागतिक संकटामुळे भारतातल्या नागरिकांवर आता आर्थिक संकट कोसळले आहे. आमचे रिटायरमेंट पैसे आम्हाला परत करा अशी मागणी आता वयोवृद्ध नागरिक करू लागले आहेत. धूप आणि गोवऱ्या - उस्मानाबाद जिल्हा प्रशासनने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच कोरोना व्हायरस पळविण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या आणि धूप जाळलाय... आयुर्वेदाचा हवाला देत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरच हे जाळण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे... कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक केल्याचा आयुर्वेदिक महाविद्यालयाने याचा दावा देखिल केला आहे. राष्ट्रवादी - राज्यातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या काळजी पोटी पुढील सर्व सभा आणि संमेलन आणि मेळावे रद्द करण्यात आल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. शरद पवार यांनी देखील सर्व सभा संमेलन कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दीच्या ठिकाणापासून लांब राहिले पाहिजे,पक्षातील सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे तरंच कोरोना वर मात करू शकतो असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

  आज वर्ल्ड कपमध्ये होणार भारत-पाक महामुकाबला, येथे पाहा सामना LIVE

  गर्दी टाळा - सध्या ग्रामीण भागात लग्न सराईचे दिवस आहेत आणि सध्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ सोहळे पार पडत आहे. यात नागरिकांनी छोटेखानी लग्न समारंभ करावेत .लग्नला मोठी गर्दी करण्याचे टाळावं असं ही आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीं केले आहे. आज बीडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खोट्या माहिती - ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झाला असा मेसेज इतर ग्रपुवर पाठविणाऱ्या एका शिक्षिकेला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे. छत्तिसगडमधल्या कांकेर जवळच्या नरसिंहपूर या गावातली ही घटना आहे. हिमन कोराम असं त्या शिक्षिकेचं नाव आहे. तिला आलेले एक मेसेज तिने काही ग्रुपवर पाठवल्याचं उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प - ब्राझील सरकारचा जो अधिकारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून गेला होता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीतून समोर आलं आहे. याबाबत ब्राझीलमधील 'एस्ताडो दे साओ पाउलो' या वर्तमानपत्राने वृत्त दिलं आहे. इराण - आत्तापर्यंत 500 नागरीकांचा मृत्यू झाला असून 10 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. मृतांची संख्या वाढत असल्याने मृतदेहांना दफन कुठे करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर कबर खोदल्या जात आहेत. दोन फुटबॉलची मैदानं भरतील एवढ्या कबर खोदल्या जात असल्याचं उपग्रहांनी घेतलेल्या फोटोत स्पष्ट झालं असं वृत्त वॉशिग्टंन पोस्टने दिलं आहे. राजधानी तेहरानपासून 120 किलोमीटरवर असलेल्या कोम शहरांजवळ हे खड्डे खोदले जात असून त्यात मृतदेहांचं दफन करण्यात येत असल्याचं म्हटलं जातं.

  ‘कोरोना’चा कहर : दफनविधीसाठी इराणमध्ये रात्रीतून मैदानात खोदल्या जाताहेत ‘कबर’

  कॅनडा - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canadian Prime Minister Justin Trudeau यांच्या पत्नी सोफी ग्रेजायर ट्रूडो (Sophie Grégoire Trudeau) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलंय. पंतप्रधानांना कसल्याची प्रकारची लक्षणे अद्याप दिसून येत नाहीत असंही या निवेदनात म्हटलं आहे. IPL -  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिली आहे. यामुळे केन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Corona virus, Corona virus india

  पुढील बातम्या